IMPIMP

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Eggs Health Benefits | is eating eggs after 40 good for health

सरकारसत्ता ऑनलाइन – अंड्यांमध्ये (Eggs) अनेक गुणधर्म असतात, ज्याचा मानवी आरोग्याला फायदा (Eggs Health Benefits) होतो. मात्र, एका विशिष्ट वयानंतर अंडी खावीत की नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, सर्व वयोगटातील लोकांनी अंड्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. जर तुम्ही हेल्दी (Healthy) आणि संतुलित आहारात (Balanced Diet) दररोज अंड्याचा समावेश केला तर स्नायू (Muscle) मजबूत होतात. याव्यतिरिक्त, सारकोपेनियाशी संबंधित गुंतागुंत, मृत्यूदर आणि आरोग्य देखरेखीचा धोका देखील कमी केला जाऊ (Eggs Health Benefits) शकतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका अंड्यामध्ये काय असते?
एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये 77 कॅलरीज, 0.6 ग्रॅम कार्ब, 5.3 ग्रॅम फॅट्स, 212 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 6.3 ग्रॅम प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी5, फॉस्फरस (Phosphorus) आणि सेलेनियम (Selenium) असतात. अंडी हे अमीनो अ‍ॅसिडचे (Amino Acids) समृद्ध स्त्रोत आहेत, तसेच ते प्रोटीनचा (Protein) सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. (Eggs Health Benefits)

चाळीशीपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोणता फायदा होतो?
वृद्ध लोकांमध्ये कमी होत जाणारे स्नायू भरून काढण्यात अंडी महत्त्वाची भूमिका बजावतात. बरेच वृद्ध त्यांच्या प्रोटीनची आवश्यकता आहाराद्वारे पूर्ण करू शकत नाहीत. वाढत्या वयात अंडी हे पोषणाचा (Nutrition) उत्तम स्रोत आहेत.

 

असे बरेच पुरावे आहेत जे सिद्ध करतात की दिवसाच्या प्रत्येक जेवणासोबत प्रोटीन घेतल्याने वृद्ध लोकांचे स्नायू मजबूत होतात.
अंडी महाग नसतात, सर्वत्र उपलब्ध असतात आणि पचायला सोपी असतात.
अंडे उच्च-गुणवत्तेच्या प्रोटीनने समृध्द असते आणि त्यात भरपूर प्रमाणात ल्युसीन (Leucine) असते.
हे एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड आहे, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
याशिवाय अंड्यामध्ये व्हिटॅमिन-डी (Vitamin-D) आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडही (Omega-3 Fatty Acid) असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका दिवसात किती अंडी खावीत?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आठवड्यातून किमान 7 अंडी खावीत.
अंडी हा गुड कोलेस्टेरॉलचा (Good Cholesterol) सर्वोत्तम स्त्रोत आहे. ते उकडून खाता येते किंवा तेलात तळूनही खाता येते.

 

Web Title :-  Eggs Health Benefits | is eating eggs after 40 good for health

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 10 मिनिटात टाटा समुहाच्या 2 शेयरमधून कमावले 186 कोटी, जाणून घ्या कसे

LIC Kanyadan Scheme | मुलीच्या विवाहासाठी मिळतील 31 लाख रुपये, केवळ जमा करावे लागतील 151 रुपये

Vijay Wadettiwar | खुशखबर ! राज्य सरकारतर्फे व्यवसायासाठी मिळतंय 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या स्वरुप व कोण असेल पात्र

 

Related Posts