IMPIMP

Eknath Khadse | ‘…म्हणून अण्णा हजारे यांचा वाईनला विरोध’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

by nagesh
Anna Hajare On Shinde-Fadnavis Govt | anna hajare said eknath shinde and devendra fadnavis government will not gave permission to wine sale in super market

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Khadse | काही दिवसांपुर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला. किराणा दुकानातून वाईन विक्रीस सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अण्णा हजारेंची भूमिका नेहमीच भाजपला समर्थनाची असते, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सरकारने वाईन विक्री संबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण केले जाणार असल्याचे अण्णा हजारेंच्या पत्रकात म्हटलं आहे. यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, ”द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा आणि वेदना सांगितल्या. मार्केटमध्ये, द्राक्षांना भाव पाहिजे असेल तर उप उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यामध्ये, वाईन हा प्रकार अगदी अलीकडच्या कालखंडांत सर्वत्र विकलाच जात आहे, अशी त्यांची भूमिका आहे. याउलट वाईन ही दारू आहे, त्यामुळे गावापर्यंत दारू जात आहे, अशा स्वरुपाची भूमिका अण्णा हजारेंची आहे. म्हणून त्यांनी वाईनला विरोध केला,” असल्याचं खडसे म्हणाले.

 

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ”मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली.
आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) भाजपला निवडून दिलं तर दारुही गरिबांच्या हिताची असल्याने
50 रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य तेथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईन बाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | so anna hazares opposition to wine eknath khadse made it clear

 

हे देखील वाचा :

जर Aadhaar Card बाबत केले ‘हे’ काम तर होईल कारावास, होऊ शकतो 1 कोटीपर्यंतचा दंड सुद्धा !

Pune Crime | ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍या ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या 190 रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल

Police Inspector Sangram Tate | बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे 13 दिवसांनी बेशुद्ध अवस्थेत सापडले; प्रचंड खळबळ

 

Related Posts