IMPIMP

Eknath Shinde Devendra Fadnavis Government | होय, ‘ED’ मुळेच आमचे सरकार आले.., सभागृहात चक्क फडणवीसांनीच सांगितले

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEknath Shinde Devendra Fadnavis Government | महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन सध्या सुरू आहे.
आज दुसर्‍या दिवशी विधानसभेत बहुमताचा ठराव घेण्यात आला. हा ठराव शिंदे-फडणवीस सरकारने जिंकला. बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या
अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवरही टिका केली. (Eknath Shinde
Devendra Fadnavis Government)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विरोधक आरोप करतात की, ईडीमुळे नवीन सरकार आले आहे. मी सुद्धा तेच म्हणतो. ईडीमुळेच हे सरकार आले आहे, पण ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र. या ईडीमुळेच सरकार आले आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, या त्यांच्या गाजलेल्या वाक्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, मी पुन्हा येईन, अशी एक कविता मी म्हटली होती. त्यावरून विरोधकांनी माझी भरपूर टिंगल-टवाळी केली. मी पुन्हा आलो आहे, आणि येताना एकटा आलो नाही तर यांनाही (शिंदे गटाला) घेऊन आलो आहे, असा टोला विरोध पक्षांना लगावला. (Eknath Shinde Devendra Fadnavis Government)

 

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.
त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
तर ठरावाच्या विरोधात 99 मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.

 

रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे.
गेले 10 दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Shinde Devendra Fadnavis Government | Yes ED Bring Maharashtra State Government ED Means Eknath And Devendra Says BJP Leader Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Shivsena | कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही, शिवसेना म्हणजे युक्रेन नाही !

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra | ‘या’ 2 कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा – शरद पवार

 

Related Posts