IMPIMP

EPFO ने दूर केली पेन्शनधारकांची चिंता, महिना संपण्यापूर्वीच मिळेल पेन्शन; जाणून घ्या

by nagesh
Interest on PF | epfo latest update interest rate credit date how to check balance and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO आपल्या सदस्यांना येणार्‍या समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत असते. आता पेन्शन स्कीम (Pension Scheme) ईपीएसशी (EPS) संबंधित लोकांच्या (Pensioners) समस्या दूर करण्यासाठी EPFO ने पुढाकार घेतला आहे. ईपीएसच्या पेन्शनधारकांना पैसे मिळण्यास विलंब होत होता. महिना उलटून गेला तरी पेन्शनचे (Pension) पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ शकत नव्हते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महिना संपण्यापूर्वी मिळेल पेन्शन
पेन्शनधारकांच्या या समस्येची दखल घेत EPFO गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी केले. आता अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत की, पेन्शनधारकांना मार्च वगळता इतर सर्व महिन्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी (Last Working Day) किंवा त्यापूर्वी पेन्शन मिळेल. मार्च महिन्याच्या बाबतीत, 1 एप्रिल किंवा त्यानंतर पेन्शन जमा केली जाऊ शकते.

 

 

क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्या या सूचना
EPFO ने सांगितले की, पेन्शन विभागाने ही समस्या लक्षात घेतली आहे. यानंतर आरबीआयच्या सूचना लक्षात घेऊन काही निर्णय घेण्यात आले. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे की, मासिक बीआरएस (Monthly BRS) बँकांना पाठवताना पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतील याची खात्री करावी. पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करावी.

यासोबतच पेन्शनधारकांच्या खात्यात बँक जेव्हा पैसे ट्रान्सफर करेल, तेव्हा जास्तीत जास्त 2 दिवस आधी ही रक्कम बँकांना द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रात येणार्‍या बँकांना आवश्यक त्या सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

 

 

यासाठी ईपीएस अनिवार्य
ईपीएफ खाते (EPF Account) असलेले सर्व कर्मचारी ईपीएससाठी पात्र मानले जातात.
ज्या कर्मचार्‍यांचे मूळ वेतन (Basic Salary) आणि डीए मिळून 15,000 किंवा त्याहून कमी आहे त्यांच्यासाठी ईपीएस अनिवार्य आहे.
कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 24 टक्के एवढी रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते.
यापैकी 12 टक्के कर्मचार्‍यांचे आणि 12 टक्के योगदान कंपनीचे आहे. कंपनीचे 8.33 टक्के योगदान ईपीएसमध्ये जमा केले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- EPFO | epfo direction eps pensioners epf account credit delay rbi bank pension

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! ऑफिसमध्ये घुसून तरुणीवर चाकू हल्ला, बारामतीमधील आज सकाळी 10.30 ची घटना

Post Office Account | पोस्ट ऑफिसमधील अकाऊंट बंद करायचे असेल तर सांभाळून ठेवा ‘हे’ कागदपत्र; जाणून घ्या

Dhanush-Aishwarya Divorce | दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या हे पॉवर कपल होणार विभक्त

 

Related Posts