IMPIMP

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo nomination pf member can change nominee in pf account online check epfo video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वेबसाईटवर लॉगईन करून ईपीएफ मेंबर्स आपला नॉमिनी निवडू शकतात. तुम्ही हे काम ऑनलाईन करू शकता. ईपीएफओन ही सुद्धा सुविधा दिली आहे की, खातेधारक कितीही वेळा नॉमिनीचे नाव बदलू शकतो. (EPFO)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ईपीएफओने यावेळी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सदस्यांनी आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ई-नॉमिनेशन भरले पाहिजे. ही प्रक्रिया सोपी आहे आणि ईपीएफओने याची यूट्यूब लिंक सुद्धा शेयर केली आहे.

 

 

ऑनलाईन नोंदवू शकता नॉमिनीचे नाव, अशी आहे पद्धत

EPFO ची अधिकृत वेबसाइट http://www.epfindia.gov.in वर लॉग इन करा.

‘सर्व्हिस’ वर जा आणि ड्रॉप डाउन मेनूमधून फॉर एम्प्लॉई ऑपशन टॅप करा.

त्यानंतर, ’सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा वर टॅप करा.

त्यानंतर यूएएन आणि पासवर्डने लॉग इन करा.

आता ‘मॅनेज’ टॅबखाली ‘ई-नॉमिनेशन’ पर्यायावर क्लिक करा.

कुटुंबाची घोषणा आणि ‘कौटुंबिक तपशील नोंदवा’ किंवा नॉमिनीची माहिती अपडेट करण्यासाठी ‘येस’ वर क्लिक करा. येथे नॉमिनीसाठी मागितलेली सर्व माहिती द्या.

कुटुंब तपशील सेव्ह केल्यावर, तुमची ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण होईल.

जर तुम्हाला एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदवायचे असतील तर ‘Add New Button’ वर टॅप करा आणि इतर नॉमिनीचे तपशील द्या

 

Web Title :- EPFO | epfo nomination pf member can change nominee in pf account online check epfo video

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत बंपर घसरण, खरेदीदारांमध्ये आनंद; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Related Posts