IMPIMP

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

by nagesh
Maharashtra Rain Update | heavy rainfall likely to continue for next three hrs over mumbai thane and parts of raigad and palghar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Weather Forecast | मागील एप्रिल महिन्यापासून राज्यासह (Maharashtra Weather Forecast) देशात उन्हाचा तडाखा लागला आहे. वाढत्या तापमानामुळे गरमीचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रातील काही भागात उन तर काही भागात पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. आगामी 24 तासामध्ये मान्सून अंदमानमध्ये (Andaman) दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज (सोमवार) अनुकूल स्थिती असल्यामुळे पावसाचं अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह (Nicobar Islands) बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. असं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आगामी 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar Islands) दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच, आगामी पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता तसेच काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Forecast)

 

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात (Bhandara) रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलं आहे. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री 12 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), सोलापूर (Solapur) यामध्ये 4 जिल्ह्यांना आणि परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 9 जिल्ह्यांना 16 ते 19 मे रोजीपर्यंत 4 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या 4 जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather Forecast | heavy rainfall possibilities in 9 districts maharashtra monsoon arrived andman

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | प्रत्येक खातेधारकासाठी मोठी बातमी, बदलले बँकेत पैसे जमा करणे आणि काढण्याचे नियम

 

Related Posts