IMPIMP

EPFO | खुशखबर ! 6.47 कोटी लोकांच्या PF अकाऊंटमध्ये पोहचले व्याजाचे पैसे, जाणून घ्या कसा चेक करावा PF बॅलन्स

by nagesh
EPFO | good news pensioners epfo launches face recognition facility will help senior citizens

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुमच्या पगारातून पीएफ (PF) कापला जात असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्के व्याज आले आहे. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायजेशन म्हणजे ईपीएफओ (Employees’ Provident Fund Organisation) ने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत 6.47 कोटी अकाऊंटमध्ये EPFO व्याज जमा केले आहे.

यासाठी तुमच्या अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे आले किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचे पीएफ अकाऊंट चेक करा. तुम्ही घरबसल्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स चेक (how to check PF Balance) करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1- मिस्ड कॉलद्वारे

PF अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला EPFO कडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.

 

 

2- SMS द्वारे

एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

 

 

3. वेबसाइटवर असे करा चेक

  • यासाठी EPFO वेबसाइटवर जा.
  • येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
  • आता View Passbook वर क्लिक करा.
  • पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

4.उमंग अ‍ॅपद्वारे

  • उमंग अ‍ॅप ओपन करा.
  • यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडा.
  • Employee Centric Services निवडा.
  • आता UAN & PASSWORD टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो टाका.
  • यानंतर व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

Web Title : EPFO | pf balance 6 47 crore people receive interest in pf account here is how you can find out

 

हे देखील वाचा :

PMRDA | मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणार्‍या कॉंग्रेसला झटका; गटातटाच्या राजकारणात PMRDA नियोजन समितीची एकमेव जागा निवडूण आणण्यात ‘अपयश’

Insurance | मॉडलने 13 कोटी देऊन काढला आपल्या केवळ ‘या’ विशेष अवयवाचा इन्श्युरन्स!

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts