IMPIMP

EPFO | विना इंटरनेट सुद्धा जाणून घेऊ शकता आपल्या PF अकाऊंटचा बॅलन्स, करावे लागेल ‘हे’ छोटे काम, जाणून घ्या पद्धत

by nagesh
EPFO | you know the balance of your pf account even without internet do this small work

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPFO | असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (EPFO) जमा केला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने पीएफ खात्यावर मिळणारे व्याज ट्रान्सफर केले. तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा झाले हे तुम्हाला अजून समजले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण येथे आम्ही तुम्हाला पीएफ खात्यातील बॅलन्स (PF Account Balance) तपासण्याचे ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्ग सांगणार आहोत. त्याबद्दल जाणून घेऊया :

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशा प्रकारे तपासा ऑफलाइन पीएफ बॅलन्स

1. एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स तपासा –
एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

 

2. मिस्ड कॉलद्वारे तपासा बॅलन्स –
पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.

 

ऑनलाइन असा जाणून घ्या बॅलन्स

1. EPFO वेबसाइटवर बॅलन्स तपासा –

  • यासाठी ईपीएफओ वेबसाइटवर जा.
  • येथे Employee Centric Services वर क्लिक करा.
  • आता View Passbook वर क्लिक करा.
  • पासबुक पाहण्यासाठी UAN द्वारे लॉगइन करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. उमंग अ‍ॅपवरूनही तपासू शकता बॅलन्स –

  • उमंग अ‍ॅप ओपन करा.
  • यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडा.
  • Employee Centric Services निवडा.
  • आता UAN & PASSWORD टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल, तो टाका.
  • यानंतर व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.

 

 

 

Web Title: EPFO | you know the balance of your pf account even without internet do this small work

 

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | 60 पैशाच्या स्टॉकनं दिले छप्परफाड रिटर्न ! वर्षभरात 3533 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 36 लाख, जाणून घ्या

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर व कंत्राटदारावर गुन्हा दाखल; CP अमिताभ गुप्ता यांनी दिली माहिती

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात इमारतीचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी; PM मोदींनी व्यक्त केले दुःख

 

Related Posts