IMPIMP

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात इमारतीचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी; PM मोदींनी व्यक्त केले दुःख

by nagesh
Pune Yerwada Building Collapse | 6 labourers killed as portion of under construction building collapses in yerwada of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Yerwada Building Collapse | येरवड्यातील शास्त्रीनगरच्या (Shastri Nagar, Yerwada) वाडिया बंगला (Wadia Bungalow) गेट नंबर 8 मध्ये एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमींना ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान, PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दुःख व्यक्त केले आहे. (Pune Yerwada Building Collapse)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर 8 येथील एका नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधणीचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री 11 वाजता हा सांगाडा अचानकपणे कोसळला. त्या सांगाड्या खाली काही कामगार काम करत होते. सांगाडा कोसळल्याने सर्व कामगार त्या खाली दबले गेले.

 

 

त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. तात्काळ अग्निशामक दलाला (Pune Fire Brigade) ही माहिती देण्यात आली.
त्यानंतर  अग्निशामक दलाच्या 6 गाड्या, 108 च्या रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले.
हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की, त्या खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर केला.
तो सांगाडा कापून कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 कामगारांना  ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिकांनी संबंधीतावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

 

Web Title :- Pune Yerwada Building Collapse | 6 labourers killed as portion of under construction building collapses in yerwada of pune

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Blood Sugar | मधुमेहात सर्वात जास्त प्रभावित होतात ‘हे’ अवयव, वेळेवर नाही केले नियंत्रण तर होऊ शकतात डॅमेज; जाणून घ्या सविस्तर

PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | ‘टँकर’ अभावी एसटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम साईटपर्यंत वाहून नेणे अशक्य

Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | पार्टीमध्ये स्विमिंग पूलच्या किनारी सगळ्यांसमोर केलं मौनी रॉय आणि सुरज नांबियारनं LipLock; व्हिडिओ झाला व्हायरल

 

Related Posts