IMPIMP

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

by nagesh
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

सरकारसत्ता ऑनलाइन –  Excessive Water Drinking | आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपण जितके जास्त पाणी पिऊ तितके निरोगी राहू पण जास्त पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. पाणी पिणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, परंतु जास्त पाणी पिण्यामुळे ओव्हरहायड्रेशन (Overhydration) होऊ शकते, ज्याला वॉटर इंटॉक्सिकेशन (Water Intoxication) देखील म्हणतात. जास्त पाणी पिणे आरोग्याला कशी हानी पोहोचवू शकते ते जाणून घेवूयात. (Excessive Water Drinking)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Excessive Water Drinking)

1 – किडनीचे नुकसान (Kidney Damage)
ओव्हरहायड्रेशनमुळे किडनीही खराब होते. जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा आर्जिनिन व्हॅसोप्रेसिनची प्लाझ्मा पातळी यामुळे कमी होते. ज्याचा थेट परिणाम किडनीच्या कार्यक्षमतेवर होतो. अशावेळी जास्त पाणी पिणे टाळणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

 

2 – लीव्हरचे नुकसान (Liver Damage)
अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की ओव्हरहायड्रेशनचे कारण केवळ साधे पाणी नाही तर जास्त लोहयुक्त पाणी ओव्हरहायड्रेशनच्या स्थितीसाठी देखील जबाबदार असते. त्यामुळे लिव्हरशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच जास्त पाणी पिणे टाळले पाहिजे. (Excessive Water Drinking)

 

3. हृदयाला धोका (Heart)
जास्त पाण्याच्या सेवनाने हृदयविकाराला बळी पडू शकता. वास्तविक, जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता तेव्हा शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट दबाव हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर पडतो. जास्त दबावामुळे हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता वाढते, त्यामुळे जास्त पाणी पिणे टाळावे.

 

4. पेशींना येते सूज
गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात केल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ लागते. त्यानंतर ऑस्मोसिस प्रक्रियेद्वारे पाणी पेशींमध्ये प्रवेश करते. त्यामुळे पेशींमध्ये जळजळ होण्याची समस्या सुरू होते. ही स्थिती अत्यंत गंभीर समस्यांना जन्म देऊ शकते, जसे की स्नायूंच्या ऊतींचे आणि मेंदूचे नुकसान इ. म्हणूनच जास्त पाणी पिणे टाळले पाहिजे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

 

Related Posts