IMPIMP

Facebook सोशल मीडियाच्या जगातील ‘राक्षस’! जगात प्रत्येक तिसरा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅक्टिव्ह’, दर तासाला होते 100 कोटीचे ‘इन्कम’

by nagesh
Facebook | facebook mark zuckerberg revenue statistics and total users in india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Social media platform Facebook) ची लोकप्रियता (popularity) संपूर्ण जगात आहे. सर्व सोशल मीडियामध्ये फेसबुक व्यापक झाले आहे. एका आकड्यानुसार फेसबुकने 9.1 अरब डॉलरचे निव्वळ उत्पन्न (Facebook net worth 9.1 billion) नोंदवले आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत हे 17 टक्के जास्त आहे.

 

सध्या फेसबुकचे 291 कोटी मासिक यूजर्स आहेत. मात्र ही संख्या या वर्षाच्या सुरुवातीला कमी होती. 2021 च्या जानेवारी-मार्चपर्यंत ही संख्या 285 कोटी होती. तर यावर्षी एप्रिल-जूनमध्ये ही संख्या 290 कोटीवर पोहचली. परंतु जुलैपासून सप्टेंबर महिन्यात फेसबुकने 291 कोटी मंथली यूजर्सचे टार्गेट पार केले. आकड्यांनुसार सरासरी जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती फेसबुकचा वापर करतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

भारतात फेसबुकचे सर्वात जास्त यूजर्स :
अमेरिकेत फेसबुक (Facebook) यूजर्सची संख्या 20 कोटी आहे, इंडोनेशियात 14 कोटी, ब्राझीलमध्ये 13 कोटी आणि मेक्सिकोमध्ये 9.8 कोटी आहे. परंतु भारतात फेसबुकचे 34 कोटी यूजर्स आहेत. अशावेळी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg) यांच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने भारत खुप महत्वाचा आहे.

 

98 टक्के कमाई जाहिरातीमधून : Most Facebook users in India
फेसबुकचा (Facebook) 98 टक्के महसूल जाहिरातीमधून येतो. याचा अंदाज तुम्ही याच्यावरून लावू शकता की, 2021 मध्ये जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान फेसबुकने 2.1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला.

 

तर फेसबुकला प्रत्येक तासाला 100 कोटी रुपयांची कमाई होते. मार्क झुकरबर्ग यांनी महसूलातील वाढीबद्दल म्हटले की, या तिमाहीत आम्ही चांगली प्रगती केली आहे. आमचे नेटवर्क सतत जगभरात वाढत आहे.

 

फेसबुकचे रोजचे 1.93 बिलियन सक्रिय यूजर्स आहेत.
हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत 6 टक्के किंवा 110 मिलियन जास्त आहे.
फेसबुकवर एक यूजर आपल्या दिवसातील सरासरी 33 मिनिटे खर्च करतो.
तर दर बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत फेसबुकवर सर्वात जास्त सक्रियता पहायला मिळते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

फेसबुकमधून रोजगार : Employment from Facebook
सक्रिय वापरकर्त्यांची तुलना जर मागील वर्षासोबत केली तर फेसबुकच्या यूजर्समध्ये 170 मिलियन किंवा 6 टक्केची वाढ झाली आहे.
सध्या 68,177 लोकांना फेसबुक रोजगार देत आहे, जी वर्ष ते वर्ष 20 टक्केची वाढ आहे.

 

Web Title :- Facebook | facebook mark zuckerberg revenue statistics and total users in india

 

हे देखील वाचा :

झोपण्याच्या ‘या’ 8 पद्धती उघड करतात निसर्गाचे गुढ रहस्य, जाणून घ्या काय सांगते तुमची Sleeping Position

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! एनसीबीनं घेतला महत्वाचा निर्णय

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

 

Related Posts