IMPIMP

Farmers Long March | अखेर पाच दिवसानंतर ‘लाल वादळ’ शमलं, जे.पी. गावित यांची घोषणा

by nagesh
Farmers Long March | farmers long march postponed former mla jp gavit announces

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांनी लाँग मार्च (Farmers Long March) काढला. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाँग मार्च (Farmers Long March) स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाच दिवसांनी शेतकरी लाँग मार्च माघारी फिरणार आहे. माजी आमदार जेपी गावित (Former MLA JP Gavit), जिल्हा प्रमुख, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाच दिवसानंतर ‘लाल वादळ’ अखेर शमले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शेतकरी नेते जेपी गावित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला सरकारनं शिष्टमंडळ घेऊन बोलावलं आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. आमच्या 70 टक्के मागळ्या सरकारने मान्य केल्यात. बाकीच्या मागण्या विचारधीन आहेत. इथे आलेल्या लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन मागे घ्यायचं की नाही हे ठरवलं होतं. बैठकीत जे निर्णय झाले, त्याची प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. ज्या मागण्या विचारधीन आहेत त्या येत्या काही दिवसांत नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते ठाण्यात बोलत होते. (Farmers Long March)

 

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ट्रेन बुक

गावित पुढे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदन आम्हाला दिले आहे.
त्यामुळे आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे गावित
यांनी सांगितले. दरम्यान सरकारतर्फे शेतकऱ्यांना घरी पोहोचण्यासाठी एक ट्रेन देखील बुक करण्यात आली आहे.
पाच दिवस आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन करत होते. दोन दिवस वाशिंद येथे मुक्काम केल्यानंतर
हे शेतकरी आज आपल्या घरी परतणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Farmers Long March | farmers long march postponed former mla jp gavit announces

 

हे देखील वाचा :

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Bhalchandra Kulkarni Passed Away | मराठी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

 

Related Posts