IMPIMP

Bhalchandra Kulkarni Passed Away | मराठी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

by nagesh
 Bhalchandra Kulkarni Passed Away | veteran marathi actor bhalchandra kulkarni passed away

सरकारसत्ता ऑनलाईन  – ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni Passed Away) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी आज सकाळी कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील आपल्या राहत्या घरी निधन झाले आहे. भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी 300 च्या वर चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. 1984 साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. (Bhalchandra Kulkarni Passed Away)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांची मराठी चित्रपट सृष्टीत विशेष ओळख होती. मात्र मागच्या काही वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामात त्यांचा विशेष सहभाग असायचा. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रस्थानी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनदेखील काम केले होते. (Bhalchandra Kulkarni Passed Away)

 

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मोठे योगदान आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते.
चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
तसेच जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bhalchandra Kulkarni Passed Away | veteran marathi actor bhalchandra kulkarni passed away

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | आय टी तरुणांना ३०० कोटींचा गंडा; बँकेच्या कामकाजातील त्रुटीचा गैरफायदा घेऊन केली फसवणूक

Parbhani Crime News | शेतात काम करत असताना वीज कोसळून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

 

Related Posts