IMPIMP

Former MLA Mohan Joshi | महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Mohan Joshi Pune | 'BJP postpones Cantonment Board elections due to fear of defeat' - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Former MLA Mohan Joshi | काँग्रेस पक्षाच्या (Congress) कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि उत्साह पाहता येत्या
महापालिका निवडणुकीत (PMC Elections) काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापालिका प्रभाग रचना आज सोमवारी जाहीर झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना मोहन जोशी म्हणाले, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) आणि आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांचे भरीव कार्य आहे, त्यामुळे भोर (Bhor) आणि पुरंदर (Purandar) विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागांमध्ये कॉंग्रेस पक्ष आघाडी घेईल. याखेरीज गेले वर्षभर काँग्रेसचे कार्यकर्ते आपापल्या प्रभागात, कार्यक्षेत्रात उत्साहाने काम करीत आहेत. पक्षाने जाहीर केलेली आंदोलने यशस्वी झाली आहेत. पुणेकरांचे प्रश्न मांडण्यात काँग्रेस आघाडीवर राहिली आहे. काँग्रेसचे नेते कन्हैयाकुमार यांच्या सभेला तरुणाईने गर्दी केली होती, ही बदलती स्थिती पाहता काँग्रेस सहजपणे मोठा विजय संपादन करेल.

 

महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) पुणेकरांसाठी एकही ठोस काम करू शकलेला नाही. नादुरुस्त रस्त्यांमुळे पुणेकर संतप्त आहेत. भाजपच्या कारभाराविषयी नैराश्य आल्याने पुणेकर पुन्हा कॉंग्रेसला साथ देईल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Former MLA Mohan Joshi | Congress will get big victory in municipal elections Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Pune Vyapari Mahasangh | व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांची प्रतिक्रिया

Casting Couch | अंकिता लोखंडेपासून तर दिव्यांका त्रिपाठीपर्यंत ‘या’ 6 अभिनेत्र्या झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार; जाणून घ्या त्यांचे अनुभव

Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना अझमीला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करून सांगितली अवस्था

 

Related Posts