IMPIMP

Pune Vyapari Mahasangh | व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांची प्रतिक्रिया

by nagesh
Pune Vyapari Mahasangh | Disappointing budget for traders Pune Chamber of Commerce Secretary Mahendra Pitaliya s reaction

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Vyapari Mahasangh | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी
मंगळवारी चौथा अर्थसंकल्प (Budget-2022) सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. अर्थसंकल्प सादर
झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून याबाबत प्रतिक्रिया येत आहे. पुणे व्यापारी महासंघाचे (Pune Vyapari Mahasangh) सचिव (Pune Chamber of Commerce Secretary) महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी हा अर्थसंकल्प व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महेंद्र पितळीया म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget-2022) जनतेची क्रयशक्ती वाढवण्यासाठी तसेच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. स्थानिक पातळीवर व्यापारी मोठ्या प्रमाणावर रोजगार (Job) निर्मिती करतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणून काही तरी घोषणा अपेक्षित होती. (Pune Vyapari Mahasangh)

 

सतत सातव्या वर्षी आयकराच्या (Income Tax) संरचनेतहि कोणतीही सूट दिलेली नसल्याने व्यापाऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक असेच ह्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल. बाकी डिजिटलायझेशन वाढवण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटीची (Digital University) स्थापना, 2023 पर्यंत स्टार्ट अप प्रकल्पांना (Start-Up Projects) करसवलत कायम, पायाभूत सुविधांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद स्वागतार्ह, असल्याचे पितळीया यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Pune Vyapari Mahasangh | Disappointing budget for traders Pune Chamber of Commerce Secretary Mahendra Pitaliya s reaction

 

हे देखील वाचा :

Casting Couch | अंकिता लोखंडेपासून तर दिव्यांका त्रिपाठीपर्यंत ‘या’ 6 अभिनेत्र्या झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार; जाणून घ्या त्यांचे अनुभव

Shabana Azmi Tests Positive For COVID-19 | सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना अझमीला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करून सांगितली अवस्था

Urfi Javed Viral Video | रस्त्याच्या कडेला गुटाखा खाल्लेल्या व्यक्तीनं सेल्फी काढण्यासाठी उर्फी जावेदसोबत केली जबरदस्ती, व्हिडिओ झाला व्हायरल

 

Related Posts