IMPIMP

Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन ‘निर्दोष’

by nagesh
Gangster Chhota Rajan | cbi court acquits gangster chhota rajan in 38 years ago case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांतून कुख्यात गुंड छोटा राजनला (Gangster Chhota Rajan) अटक करण्यात आली होती. मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या छोटा राजनच्या गुन्हेगारीमधील हा पहिला मोठा गुन्हा (FIR) होता. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) कोर्टाकडून राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1983 मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. राजनवर दाखल झालेला हा पहिलाच मोठा गुन्हा होता. तर, हत्येचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या आरोपाअंतर्गत राजनवर  खटला चालवण्यात आला. मात्र खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचा तसेच प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. साक्षीदार सापडत नसल्याचे सीबीआयकडून (CBI) न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे (Judge A. T. Wankhede) यांनी राजनला त्याच्यावरील या सगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष ठरवले आहे.

दरम्यान, दारू तस्करी प्रकरणात छोटा राजनच्या विरोधात 38 वर्षांपूर्वी पहिला गुन्हा दाखल केला होता. 1983 मध्ये टिळक नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने टॅक्सीमधून दारूची तस्करी करणाऱ्या छोटा राजनला (Gangster Chhota Rajan) रोखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पोलीस पथकात 2 अधिकारी आणि 4 हवालदार होते, तसेच राजनसोबत कारमध्ये त्याचे 2 सहकारी सुद्धा होते. असं छोटा राजनचे वकील तुषार खंदारे (Adv Tushar Khandare) यांनी सांगितले.

 

Web Title :- Gangster Chhota Rajan | cbi court acquits gangster chhota rajan in 38 years ago case

 

हे देखील वाचा :

Bhandara Crime | आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

Pune News | महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना इशारा, म्हणाले – ‘प्रशांत जगताप वागणं बदला, अन्यथा शिक्षा भोगावी लागेल’

EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?

 

Related Posts