IMPIMP

Pune News | महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना इशारा, म्हणाले – ‘प्रशांत जगताप वागणं बदला, अन्यथा शिक्षा भोगावी लागेल’

जगताप यांनी आपले मानसिक संतुलन एकदा तपासून घावे

by nagesh
Pune News | Mayor Murlidhar Mohol warns NCP's city president, says - 'Change Prashant Jagtap's behavior, otherwise he will be punished'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | भाजप (BJP) पुणे शहरात गुंडीगिरी पसरवत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी केला आहे, तसेच त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता मोहोळ यांनी थेट इशाराच (Pune News) दिला आहे.

रोज उठायचं आणि माध्यमांसमोर काहीही बोलायचं ही प्रशांत जगताप यांची सवय बनली आहे. उठसुठ कोणत्याही नेत्यावर आरोप करायचे हा त्यांचा धंदा असून कोणतीही सत्यता न तपासता आरोप करने चुकीचे आहे, त्यांनी आपले मानसिक संतुलन एकदा तपासून घ्यावे, अशी टीका पुण्याचे (Pune News) महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

संघटीत गुन्हेगारी करणारे तुमचे किती लोक जेलमध्ये होते हे सर्वांना माहीत आहे. वयक्तिक पातळीवर येऊन आरोप करू नका, तुम्ही वागणं बदललं नाहीत तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा इशाराच मोहोळ यांनी दिला आहे.

जगताप यांना फार गांभीर्याने घेत नाही, आम्हीही 20 – 25 वर्षांपासून राजकारणात काम करतो,
पण कधीही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा खा सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली नाही.
मोठ्या नेत्यांची नावे घेताना सांभाळून बोलायला हवं, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राजकीय कारकीर्द 45 वर्षांची आहे.
जगतापांचे तेवढे वय देखील नाही, अशी टीकाही मोहोळ यांनी केली (Pune News) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

जगताप दुसऱ्याकडे दोन बोटे दाखवतात तेव्हा चार बोटे तुमच्याकडे असतात हे पहा,
दोन- चार वर्षानंतर अज्ञात वासातून आल्याने प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रशांत जगताप आरोप करतायत,
जो चुकीचा असेल त्याला पोलीस बघतील, असंही मोहोळ यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Pune News | Mayor Murlidhar Mohol warns NCP’s city president, says – ‘Change Prashant Jagtap’s behavior, otherwise he will be punished’

 

हे देखील वाचा :

EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?

SEBI New Rules | म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीवर सेबीचा ‘वॉच’, गैरफायदा घेता येऊ नये यासाठी बनवला नवीन नियम

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी

 

Related Posts