IMPIMP

Goa Mumbai Highway | खारेपाटणमध्ये भीषण अपघात ! पुलावरुन कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यु

by nagesh
Goa Mumbai Highway | Terrible accident in Kharepatan! The container fell directly into the river from the bridge, killing both on the spot

खारेपाटण : सरकारसत्ता ऑनलाइन  – गोवा -मुंबई महामार्गावरील (Goa Mumbai Highway) खारेपाटण येथील मुख्य पुलावरुन वेगाने जाणारा कंटेनर थेट नदी पात्रात कोसळला. त्यात कंटेनरमधील चालक व वाहक यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हा कंटेनर गोव्याकडून -मुंबईकडे चालला होता. कंटेनरमध्ये सिपला कंपनीची औषधे होती. रात्रीच्या वेळी वेगाने जात असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले व हा कंटेनर खारेपाटण पुलावरुन सुमारे ८० फुट खोल नदीच्या पाण्यात कोसळला (Goa Mumbai Highway). नदीच्या पाण्यात कोसळताना झालेल्या आवाजामुळे लोकांना ही घटना लक्षात आली. नदीमध्ये पाणी असल्याने तसेच प्रवाह मोठा व रात्रीचा काळोख यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. दोर्‍यांच्या सहाय्याने नागरिक व पोलिसांनी कंटेनरमधील दोघांना बाहेर काढले. अपघातात वाहन चालक व वाहक या दोघांचा ही मृत्यु झाला होता. मृतदेह खोरपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

 

 

Web Title :- Goa Mumbai Highway | Terrible accident in Kharepatan! The container fell directly into the river from the bridge, killing both on the spot

 

हे देखील वाचा :

Shridhar Patankar ED Raids | CM उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ ! ‘आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंचीही चौकशी होणार?’

ST Workers Strike | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण अशक्य

Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

 

Related Posts