IMPIMP

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे जोरदार टीकास्त्र; म्हणाले – ‘राज ठाकरेंचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम’

by nagesh
Eknath Shinde Group | eknath shinde camp rebel shivsena mla chimanrao patil salms gulabrao patil for leaving uddhav thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Gulabrao Patil | गुढीपाडव्याच्या मेळाव्यादरम्यान बोलताना मनसेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मशिदीवरील भोंगे हटवा नाहीतर त्याच्यापेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा मशिदीसमोर लावण्यात येईल, असा इशाराही दिला. यानंतर आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुलाबराव पाटील म्हणाले, ”ज्याप्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 ऋतू आहेत. त्याप्रमाणे राज ठाकरे हे त्या 3 ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. राज ठाकरे यांनी ‘मनसे’ स्थापन करण्यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांना कल्याणमध्ये मारहाण केली. त्यानंतर ‘मनसे’ स्थापन करताना हम सब भाई है, असे म्हणाले. पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. मध्येच त्यांना साक्षात्कार झाला आणि नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) गुजरातला गेले. त्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींवर टीका केली आणि त्यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला. त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) मुलाखत घेतली. आता त्यांना शरद पवार वाईट झालेत.” असा टोला त्यांनी लगावला.

 

 

पुढे बोलताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, ”राज ठाकरे यांचा हा सगळा सिझनेबल कार्यक्रम आहे. कोणत्याच ऋतूत त्यांना काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, तसेच हिवाळ्यात थंडी वाजत नाही. तर, मूळ त्यांनाच धागा मिळत नाही. मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्यांची धडपड सुरूय. तसेच राज ठाकरे यांनी मी लहानपणापासून ओळखतो. मी शिवसैनिक आहे. ते आमच्या जिल्ह्यात येत होते. चंचल माणूस, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, ”भोंगा उतरवा म्हणणारे पहिले बाळासाहेब ठाकरे होते.
त्या काळात कोणाचीही हिंमत होत नव्हती. बोलणं सोपं आहे, करणं कठिण आहे.
त्यांना जितका मी ओळखतो तितके तुम्ही ओळखत नाही,” असे ते पुढे म्हणाले.
‘भेट घेतली पाहिजे. त्यांच्या नावात ठाकरे आहे.
राज ठाकरे हे काहीतरी आरोप करायचे म्हणून करतात.
ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं.
‘ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title : Gulabrao Patil | shivsena leader and minister gulabrao patil target mns chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

Acid Reflux | जेवल्यानंतर छातीत जळजळ होते का? अ‍ॅसिड रिफ्लक्समध्ये ‘या’ 10 पद्धती देतील आराम; जाणून घ्या

Heatstroke in Maharashtra | राज्यात पारा चढता; उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू

RRR OTT Release Date | ‘या’ दिवशी ओटीटीवर रिलिज होणार राजामौलीचा ’आरआरआर’, लक्षात ठेवा तारीख

Pune-Mumbai Highway Accident | पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

 

Related Posts