IMPIMP

Happy Birthday Farhan Akhtar | ‘या’ व्यक्तीमुळे फरहान अख्तरने ‘दिल चाहता है’ चित्रपट लिहिला होता

by nagesh
Happy Birthday Farhan Akhtar | farhan akhtar today is the birthday of farhan akhtar who made his directorial debut with the movie dil chahta hai

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Happy Birthday Farhan Akhtar | आज अभिनेता दिग्दर्शक गायक आणि गीतकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फरहान अख्तरचा वाढदिवस आहे. फरहानचा जन्म 9 जानेवारी 1974 साली मुंबईतील एका इराणी मुस्लिम कुटुंबात झाला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील प्रवास. (Happy Birthday Farhan Akhtar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फरहानने आपल्या कार्यक्षेत्राची सुरुवात दिग्दर्शक क्षेत्रातून केली होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. 2001 साली त्यांनी ‘दिल चाहता है’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्याने ‘लक्ष्य’, ‘डॉन’, ‘पॉझिटिव्ह’, ‘डॉन 2’ यासारखे हिट सिनेमे देखील दिग्दर्शित केले. सिनेमे दिग्दर्शित करताना त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि 2008 साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात उतरला. यानंतर त्यांनी ‘लक बाय चान्स’,’ द फकिर ऑफ व्हेनिस’, ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘शादी के साईड इफेक्ट्स’, ‘दिल धडकने दो’ अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटात उत्तम अभिनय साकारून चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. (Happy Birthday Farhan Akhtar)

 

फरहान अख्तरला त्याच्या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. 2001 साली आलेल्या ‘दिल चाहता है’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. त्यानंतर ‘रॉक ऑन’ या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले एक सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार तर एक सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

फरहानच्या लव लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास त्याचे नाव कुठल्याही अभिनेत्री सोबत कधीही जोडले गेले नव्हते.
2000 मध्ये अनुदा बाबानीशी लग्न गाठ बांधली. अनुदा बाबानी ही एक सेलिब्रिटी व हेअर स्टायलिस्ट होती.
त्यांना शाक्या व अकिरा या दोन मुली झाल्या नंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
2019 साली क्रिकेट प्रेझेंटर शिबानी दांडेकर सोबत फरहानने पुन्हा लग्न केले आणि
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका मुलाखती दरम्यान फरहानने ‘दिल चाहता है’ हा चित्रपट आईमुळेच लिहिल्याचे स्पष्ट केले होते.
यावेळी बोलताना तो म्हणाला होता की, “महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर मी काहीच काम करत नव्हतो.
त्यावेळी आई मला फार कंटाळाची. मी तिला खूप त्रास दिला होता.
माझ्या त्रासाला कंटाळून एके दिवशी आईने ठरवले की एका वर्षात काहीतरी काम कर नाहीतर
घरात राहता येणार नाही अशी स्पष्ट ताकीतच तिने मला दिली.
या भीतीने मी ‘दिल चाहता है’ हा चित्रपट लिहिला होता.

 

Web Title :- Happy Birthday Farhan Akhtar | farhan akhtar today is the birthday of farhan akhtar who made his directorial debut with the movie dil chahta hai

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार – जितेंद्र आव्हाड.

Sanjay Raut | शिंदे सरकारच्या भवितव्याबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हे तर…’

Maharashtra Cabinet Expansion | ‘मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही’ – काँग्रेस

 

Related Posts