IMPIMP

Hema Malini | शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर थेट हेमा मालिनींनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

by nagesh
Hema Malini | hema malini responded directly controversial statement shivsena minister gulabrao patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Hema Malini | नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जळगावमध्ये शिवसेनेचे नेते (Shiv Sena) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका वक्तव्यामुळे प्रंचड गदारोळ निर्माण झाला. रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालांशी केली होती. यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर खुद्द हेमा मालिनी यांनी या वक्तव्यावरुन उत्तर दिलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

हेमा मलिनी (Hema Malini) म्हणाल्या, ‘मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील, असे म्हणत हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली आहे. लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर टीका करताना, मागील 30 वर्ष ते या भागातील आमदार आहेत.
पण ते चांगले रस्ते करू शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत,
असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटील यांच्या याच विधानावर आता निषेध व्यक्त केला जात आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Hema Malini | hema malini responded directly controversial statement shivsena minister gulabrao patil

 

हे देखील वाचा :

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा

Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न

Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं

 

Related Posts