IMPIMP

Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं

by nagesh
Pune Crime | In Pune city, a case was filed against 5 members of Jat Panchayat and they were asked to boycott

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनमुलाने जातीबाह्य विवाह केल्याच्या कारणावरुन समाजात सामील होण्यास बहिष्कार (social exclusion) घालण्यास सांगणाऱ्या जातपंचायतीच्या 5 जणांवर पुण्यात (Pune Crime) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील (Pune Crime) दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अरणेश्वर गवळीवाडा येथील मुक्तांगण शाळेच्या (Muktangan School) हॉलमध्ये घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरीभाऊ हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळु औरंगे व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र समाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यांतर्गत (Social Exclusion Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामचंद्र भाऊसाहेब पंगुडवाले (वय-69 रा.गवळीवाडा, खडकी) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईक संजय नायकु यांच्या मुलाचा 27 नोव्हेंबर रोजी साखरपुडा होता. समाजाने आणि नायकु यांनी आमंत्रित केल्याने फिर्यादी मुक्तांगण शाळेच्या हॉलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमासाठी समाजाचे पंच असलेले आरोपी हे देखील आले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या मुलाने जातीबाहेरील मुलीशी लग्न केले आहे, त्यांना आमच्यात येणे बंद केले आहे. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमास का बोलावले? असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना समाजात सामील होण्यास बहिष्कार घालण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे (Sinhagad Road Division)
सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krishna Indalkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकाळजे (PSI Nikalje) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Pune city, a case was filed against 5 members of Jat Panchayat and they were asked to boycott

 

हे देखील वाचा :

Hrishikesh Kanitkar | पाकिस्तान विरूध्द एक चौकार मारल्यानं बनला ‘हा’ क्रिकेटर हिरो; आता टीम इंडियाला देणार कोचिंग

Rupali Thombre Patil | ‘शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात आमदार होता आले नाही’ – रुपाली ठोंबरे पाटील

Ahmednagar Crime | धक्कादायक ! माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची गळफास घेऊन आत्महत्या; संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ

 

Related Posts