IMPIMP

High Uric Acid कंट्रोल करण्यात उपयोगी आहे सफरचंदाचे व्हिनेगर, अशाप्रकारे आहारात समावेश

by nagesh
High Uric Acid | apple cider vinegar is helpful to reduce high uric acid problem know how to add in diet

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – High Uric Acid | युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारचे केमिकल आहे, जे शरीरात प्युरिन (Purine) नावाच्या प्रथिनांच्या विघटनाने तयार होते. शरीरातील काही पेशी आणि खाद्यपदार्थांपासून प्युरिन तयार होते. हे केमिकल किडनीद्वारे फिल्टर केल्यानंतर शरीराबाहेर टाकले जाते, मात्र जेव्हा ते शरीरात जास्त प्रमाणात होते, तेव्हा किडनी ते फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे Uric acid क्रिस्टलच्या स्वरूपात विभागून हाडांमध्ये जमा होऊ लागते. (High Uric Acid)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोग्य तज्ञ सांगतात की, यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यामुळे संधिवात आणि सांधेदुखीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय उच्च युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्यूअर आणि अनेक अवयव निकामी होण्याची शक्यता असते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) वाढलेले यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. (High Uric Acid)

 

सफरचंद व्हिनेगर (Apple Cider Vinegar) :
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. वाढलेले यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासोबतच ते रक्तातील पीएच पातळी वाढवण्यासाठी मदत करते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे नियमित सेवन केल्याने मधुमेह, कॅन्सर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी निगडित आजारही टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

 

अशा प्रकारे आहारात करा समावेश :
सफरचंद सायडर व्हिनेगर प्रथम पाण्यात मिसळा आणि नंतर त्याचे सेवन करा.
कारण या व्हिनेगरमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे रोज एक ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन करावे.

 

जेवणाच्या एक किंवा अर्धा तास आधी तुम्ही अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेऊ शकता.
अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Uric Acid | apple cider vinegar is helpful to reduce high uric acid problem know how to add in diet

 

हे देखील वाचा :

Zilla Parishad Recruitment | जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 पदांची भरती प्रक्रिया रद्द, 20 लाख तरुणांना धक्का

Shivsena MLA Anil Parab | ‘साई रिसॉर्ट पाडणे आहे’ बांधकाम विभागाची वर्तमानपत्रात टेंडरसाठी जाहिरात

NCP MLA Jitendra Awhad | मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाचा दणका, न्यायालयाने बजावली नोटीस

 

Related Posts