IMPIMP

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते चावी प्रदान

by sachinsitapure
Punit Balan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने शिखर शिंगणापूर Shikhar Shingnapur (ता. माण, जि. सातारा – Man Satara) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ (Ved Vignan Maha Vidya Peeth) संचलीत श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांच्या हस्ते स्कूल बसची चावी संस्थेकडे देण्यात आली. (Indrani Balan Foundation)

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे राज्यभरच नाही तर देशभरात विविध क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा झेंडा अगदी काश्मीरपर्यंत डौलाने फडकत आहे. यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रिडा, सामाजिक कार्याचा समावेश आहे. पोलिस विभाग आणि लष्करासोबतही त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावले आहे.

त्याचाच भाग म्हणून शिखर शिंगणापूर येथेही वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत सुरु असलेल्या श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून 41 आसन क्षमता असलेली स्कूल बस देण्यात आली. दुष्काळी भाग असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना या स्कूल बसचा उपयोग होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art Of Living) अपेक्स मेंबर राजय शास्तारे, आदित्य जोशी, अमोल येवले आणि महेश सोनी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

‘‘समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वांत मोठे साधन आहे. दुष्काळी आणि ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना केवळ प्रवासाच्या सुविधेअभावी या शिक्षणापासून वंचित रहावं लागू नये, या भावनेतून श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ही स्कूल बस देण्यात आली. या शैक्षणिक कार्यास हातभार लावता आला, याचं मनापासून समाधान आहे.’’

पुनीत बालन (अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)

Related Posts