IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; न्युट्रिलिशियस् संघाची विजयी सलामी !!

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Team) सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. न्युट्रिलिशियस् संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. या दोन्ही सामने मिळून दोन शतके, पाच अर्धशतकांसह ८६५ धावांचा पाऊस पडला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋतुराज वीरकर याच्या नाबाद ११० धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ४६ धावांनी पराभव केला. पुनित बालन ग्रुप संघाने २० षटकात २४० धावांचा डोंगर उभा केला. ऋतुराज वीरकर याने ५८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह ११० धावांची खेळी केली. यासह आतिश कुंभार याने १७ चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६० धावा चोपल्या. धनराज शिंदे याने ४३ धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १९४ धावांवर मर्यादित राहीला. जय पी. (७० धावा) आणि गिरीश कोंडे (५४ धावा) यांनी ब्रेव्हहार्टकडून प्रतिकार केला.

 

योगेश ताकवले याच्या शतकी धावांच्या जोरावर न्युट्रिलिशियस् संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीचने २० षटकात २१५ धावांचा आव्हान उभे केले. शुभम उपाध्याय (७४ धावा), श्रीधर बारोट (४५ धावा) आणि हर्ष संघवी (३७ धावा) यांनी संघाला २१५ धावा धावफलकावर लावल्या. न्युट्रिलिशियस् संघाने हे आव्हान १८ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. योगेश ताकवले याने १०० धावांची तर, अर्थव काळे याने नाबाद ८२ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुनित बालन ग्रुपः २० षटकात ४ गडी बाद २४० धावा (ऋतुराज वीरकर नाबाद ११० (५८, १२ चौकार, ६ षटकार), आतिश कुंभार नाबाद ६० (१७, ४ चौकार, ६ षटकार), धनराज शिंदे ४३, नीरज शर्मा ३-२९);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी ऋतुराज आणि धनराज ११२ (५८); पाचव्या गड्यासाठी ऋतुराज आणि आतिश ८७ (२४) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १९४ धावा (जय पी. ७० (३८, ५ चौकार, ६ षटकार), गिरीश कोंडे ५४ (२६, ६ चौकार, ३ षटकार), वैभव लवांडे ३८, पुनित बालन २-४१); सामनावीरः ऋतुराज वीरकर;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ६ गडी बाद २१५ धावा (शुभम उपाध्याय ७४ (२७, ४ चौकार, ८ षटकार),
श्रीधर बारोट ४५, हर्ष संघवी ३७, विकी अवघडे २२, ओम पवार २-२०) पराभूत
वि. न्युट्रिलिशियस्ः १८ षटकात २ गडी बाद २१६ धावा (योगेश ताकवले १०० (५१, १४ चौकार, ४ षटकार),
अर्थव काळे नाबाद ८२ (४२, ११ चौकार, २ षटकार);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी १६९ (८०);
सामनावीरः योगेश ताकवले;

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार, चाकणमधील घटना

Swatantryaveer Savarkar | सावरकरांच्या जन्मगावी राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; संपूर्ण गावाने पाळला कडकडीत बंद

Sinhagad Fort | 10 दिवसात दुसऱ्या किल्ल्याला अतिक्रमणाच्या बंधनातून सोडवले; संग्रामगड पाठोपाठ सिंहगडही अतिक्रमण मुक्त

 

Related Posts