IMPIMP

Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन  – Jalna ACB Trap | शेतकर्‍यांसाठी 4 गावात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी अंदाजपत्रक व कार्यारंभ आदेश देण्यासाठी 80 हजार रूपयांची लाच घेताना जालना जिल्ह्यातील भोकरदन (Bhokardan) उपविभागातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या उप कार्यकारी अभियंता दिपक काशिनाथ तुरे Deepak Kashinath Ture (50) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. (Jalna ACB Trap)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी 43 वर्षीय इलेक्ट्रिक ठेकेदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. शेतकर्‍यांसाठी 4 गावात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी उप कार्यकारी अभियंता दिपक काशिनाथ तुरे यांनी अंदाजपत्रक व कार्यारंभ आदेश काढण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रूपयाची मागणी करून एकुण 80 हजार रूपयांची लाच (Jalna Bribe Case) मागितली. तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष तुरे यांनी 80 हजार रूपये लाच घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Jalna ACB Trap)

 

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अप्पर अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुदाम पाचोरकर (Sudam Pachorkar),
पोलिस हवालदार ज्ञानदेव झुंबड, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर मस्के, कृष्णा देठे, गणेश बुजाडे यांनी केली आहे.

 

Web Title :- Jalna ACB Trap | Deputy Executive Engineer Deepak Kashinath Ture in anti-corruption net while taking bribe of 80 thousand

 

हे देखील वाचा :

Pune Crime | न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल; प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून

Tunisha Sharma Death | तुनिषा मृत्यू प्रकरणी मैत्रीण राया लबीबने केले ‘हे’ मोठे विधान

Kasba Constituency By-Election | … तर कसबा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यास तयार- रुपाली ठोंबरे (व्हिडिओ)

 

Related Posts