IMPIMP

Kasba Constituency By-Election | … तर कसबा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्यास तयार- रुपाली ठोंबरे (व्हिडिओ)

by nagesh
Kasba Constituency By-Election | rupali thombre patil expressed desire for kasaba peth byelection

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Constituency By-Election) आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे. रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक (Kasba Constituency By-Election) बिनविरोध करण्याची भाजपच्या गोटातून मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी ही पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने जर आदेश दिले तर मी पोटनिवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kasba Constituency By-Election) लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रीय नाहीत तर मुलगा लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे.

 

 

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेनं (MNS) रुपाली ठोंबरे यांचे तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही तडजोड केली मात्र आता या मतदारसंघात कुठलीही विकासाची कामे झालेली नाहीत. या भागाचे खासदार देखील आजारी आहेत. त्यामुळे आता परिसरात काम करणारी व्यक्ती निवडून आली तर पाच लाख लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातील लोकांची कामे मार्गी लागतील. त्यामुळे पक्षाने जर आदेश दिले तर मी ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी सांगितले.

 

असं असतं की पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे. परंतु ही अपेक्षा कोणी करावी,
ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणूका बिनविरोध केल्या असतील तर अशी अपेक्षा करावी. पण पंढरपुरची पोटनिवडणूक झाली,
मुंबईची पोटनिवडणूक झाली. मुंबईच्या पोटनिवडणुकीत महिलेला किती त्रास देण्यात आला हे सर्वांनी पाहिले आहे.
जी पोटनिवडणूक लागणार आहे की हसत खेळत पार पडणं गरजेचं असल्याचं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kasba Constituency By-Election | rupali thombre patil expressed desire for kasaba peth byelection

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल तर राऊतांच्या…’, ठाकरे गटाच्या नेत्याचं खुलं आव्हान

NCP Chief Sharad Pawar | खा. गिरीश बापटांनी दिला शरद पवारांना शब्द, म्हणाले – ‘मी आता बरा आहे, लवकरच परत येईन’

Tunisha Sharma Death | तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकार शीझान खानने केला ‘हा’ मोठा खुलासा

 

Related Posts