IMPIMP

Job Offer Fraud | एका SMS ने मूर्ख बनवले ! काही क्षणात गमावले 3 लाख रुपये; जाणून घ्या अन् व्हा सावध

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Job Offer Fraud | जर तुम्हाला एसएमएसद्वारे एखाद्या ई-कॉमर्स कंपनीत जॉबची ऑफर आली तर सावध व्हा. कारण हा फ्रॉड असू शकतो (Job Offer Fraud). अशाप्रकारच्या एका फ्रॉडमध्ये मुंबईच्या वडाळामधील एका तरुणाला 3 लाख रुपयांना चूना लावण्यात आला आहे. तरूणाने पोलिसात तक्रार केल्यानंतर तपास सुरू केला आहे. अशी घटना कुणासोबतही घडू शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

एका SMS ने सुरू झाली कथा

वडाळ्याच्या सीजीएस कॉलोनीत राहणार्‍या 26 वर्षीय पारसला (काल्पनिक नाव) एक एसएमएस आला. त्यामध्ये लिहिले होते, तुम्ही एका प्रसिद्ध कंपनीसोबत पार्ट-टाइम जॉब करून रोज जवळपास 8 हजार रुपये कमवू शकता. 8000 रुपये रोज म्हणजे महिना जवळपास दोन-अडीच लाख रुपये.

लिंकवर क्लिक करणे पडले महागात

पारसला वाटले ही चांगली संधी आहे, याच मेसेजमध्ये एक व्हॉट्सअप (WhatsApp) लिंक दिली होती. पारसने त्यावर क्लिक केले. ती लिंक पारसला एका व्हॉट्सअपच्या नंबरवर घेऊन गेली. हा नंबर एका मुलीचा होता, जिने तिचे नाव मरस्या सांगितले. (Job Offer Fraud)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जॉब प्रोफाइल आणि रजिस्ट्रेशन पेज

त्या मुलीने पारसला माहिती दिली आणि म्हटले, मी तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक पाठवत आहे. त्या लिंकवर जाऊन रजिस्टर करा. पारसने तसेच केले. पारसने लिंकवर माहिती शेयर करताच त्याला अन्य लोकांचे फोन येऊ लागले. त्या लोकांनी म्हटले की, ते ई-कॉमर्स कंपनीतून बोलत आहेत. यामुळे पारसला वाटले आपली नोकरी पक्की झाली आहे.

दाखवले बोनसचे आमिष

पारसला विश्वासात घेतल्यानंतर त्याच्याकडून पैसे काढण्यासाठी जाळे फेकण्यात आले. त्यांनी म्हटले की, आता काही पैसे जमा केल्यानंतर मोठा बोनस मिळेल. हळु-हळु करून पारसने 3 लाख 4 हजार रुपये वेगवेळ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. जेव्हा कोणताही बोनस मिळाला नाही आणि सायबर गुन्हेगारांनी आणखी पैसे मागितले तेव्हा पासरला समजले की, हा फ्रॉड आहे.

 

फ्रॉडपासून असा करा बचाव

1. आपल्या कार्डची (क्रेडिट किंवा डेबिट) माहिती इतर कुणालाही देऊ नका.

2. कुणाच्या सांगण्यावरून फोनमध्ये कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करूनका.

3. जर कुणी व्यक्ती लिंक शेयर करत असेल ती उघडू नका.

4. पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉबसाठी कुणी पैसे मागितले तर देऊ नका, कारण तो 100 टक्के फ्रॉडच असणार.

 

Web Title : Job Offer Fraud | man duped of rs 3 lakh by cyber fraudsters in mumbai digital fraud

 

हे देखील वाचा :

Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’

Gold Price Today | चांदीत 1300 रुपयांपेक्षा मोठी ‘घसरण’, सोने 45 हजार रुपयांच्या ‘खाली’; जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune Corporation | पुण्यातील रस्ते खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामांसाठी पुन्हा कोट्यवधीच्या निविदा; महापालिकेचा ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’चा कारभार

 

Related Posts