IMPIMP

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघांचे सलग विजय

by nagesh
 Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First 'Joshi Sports Karandak' Premier League T20 Cricket Tournament! LK XI, Global Warriors Cricket Club Teams Consecutive Wins

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलके इलेव्हन संघाने सलग तिसरा तर, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने सलग दुसरा विजय नोंदवित आगेकूच केली. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विपुल खैरे याच्या अचूक गोलंदाजी आणि फलंदाजांच्या योगदानामुळे एलके इलेव्हन संघाने आयोध्या वॉरीयर्स संघावर ३ धावांनी निसटता विजय नोंदविला आणि स्पर्धेत विजयाची हॅट्रीक साजरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एलके इलेव्हनने १८ षटकात १६४ धावा धावफलकावर लावल्या. शंतनु आठवले (२२ धावा), हृषीकेश आगाशे (२२ धावा), गिरीष कोंडे (२१ धावा) आणि निनाद पाठक (नाबाद २२ धावा) यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. विनायक शिंत्रे (४४ धावा) आणि सिद्धार्थ वैद्य (३९ धावा) यांच्या फलंदाजीमुळे आयोध्या वॉरीयर्स विजयाच्या समीप पोहचले. पण मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झाले आणि संघाचा विजय ३ धावांनी दूर राहीला. विपुल खैरे (२-१९) आणि अमित गणपुळे (२-२१) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

मनीष शेजवाल याच्या नाबाद ७६ धावांच्या जोरावर ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने विकेंड वॉरीयर्स संघाचा १०० धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबने १९१ धावांचे आव्हान उभे केले. मनिष शेजवाल याने ५२ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज वीरकर (३७ धावा) आणि अजय पाटील (२० धावा) यांनी चांगली साथ दिली. धावांचा पाठलाग करताना विकेंड वॉरीयर्सचा डाव ९१ धावांवर गडगडला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एलके इलेव्हनः १८ षटकात ९ गडी बाद १६४ धावा (शंतनु आठवले २२, हृषीकेश आगाशे २२, गिरीष कोंडे २१, निनाद पाठक नाबाद २२, यश तुंगे ४-३८) वि.वि. आयोध्या वॉरीयर्सः १८ षटकात ९ गडी बाद १६१ धावा (विनायक शिंत्रे ४४, सिद्धार्थ वैद्य ३९, विपुल खैरे २-१९, अमित गणपुळे २-२१); सामनावीरः विपुल खैरे;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १९१ धावा (मनिष शेजवाल नाबाद ७६ (५२, १२ चौकार),
ऋतुराज वीरकर ३७, अजय पाटील २०, किरण बोराटे ३-३९) वि.वि. विकेंड वॉरीयर्सः १३.४ षटकात १० गडी बाद ९१
धावा (सागर कांबळे २२, देवेंद्र शिंदे १७, क्षितीज कबीर ३-७, राज सांबरे २-१४, गौरव गोलहार २-२७); सामनावीरः मनिष शेजवाल;

 

 

Web Title :-  Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament! LK XI, Global Warriors Cricket Club Teams Consecutive Wins

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! पुणे पोलिसचा सलग दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाची विजयी कामगिरी

Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल

Bhaurao Karhade’s ‘TDM’ | तुमच्या-आमच्यातल्या भाऊरावांचा महात्त्वाकांक्षी”टीडीएम”येतोय..

 

Related Posts