IMPIMP

K Viswanath Passes Away | ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेते तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन

by nagesh
K Viswanath Passes Away | legendary telugu director k viswanath passes away

सरकारसत्ता ऑनलाईन  –   K Viswanath Passes Away | चित्रपटसृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महान तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ यांचे काल रात्री अल्पशा आजारामुळे निधन (K Viswanath Passes Away) झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना चित्रपटसृष्टीमधील योगदानाबद्दल भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ दिला होता. कला तपस्वी म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीमध्ये ओळख होती. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील मोठे योगदान दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

के. विश्वनाथ यांचे चित्रपट सृष्टीमधील योगदान

आंध्र प्रदेशमधील पेडापुलीवारु येथे 1930 साली के. विश्वनाथ यांचा जन्म झाला. विश्वनाथ यांचे वडील मद्रासच्या चित्रपट-स्टुडिओत तंत्रज्ञ. त्यांनी प्रशासन या विषयात पदवी घेतल्यानंतर विश्वनाथ यांनीही त्याच स्टुडिओत ध्वनिमुद्रकाची नोकरी धरली. यानंतर त्यांनी चित्रपट निर्माते अदुर्थी सुब्बाराव यांच्यासमवेत काम सुरू केले. चेन्नई स्टुडिओत त्यांनी ‘आत्मगौरवम्’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘चेलेली कापुरम्’, ‘ओ सीता कथा’, ‘जीवन ज्योती’ व ‘सारदा’ यांसारखे चित्रपट केले. तसेच त्यांनी ‘स्वराभिषेकम्’, ‘पांडुरंगाडु’, ‘नरसिंहा नायडू’, ‘लक्ष्मी नरसिंहा’, ‘सीमासिंहम्’, ‘कुरुथीपुनाल’, ‘काक्काई श्रीरंगीनिले’, ‘बागवथी’ या चित्रपटामध्ये अभिनयदेखील केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

के. विश्वनाथ यांचे हिंदी चित्रपट

के. विश्वनाथ (K Viswanath Passes Away) यांनी हिंदीत ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘शुभकामना’,
‘जाग उठा इन्सान’, ‘सूरसंगम’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’, ‘धनवान’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
अपंगत्व, अस्पृश्यता व हुंडा यांसारख्या सामाजिक प्रश्नांवरचे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते.

 

के. विश्वनाथ यांना मिळालेले पुरस्कार

1992 मध्ये के. विश्वनाथ यांना भारत सरकारने पद्मश्री जाहीर केला होता.
तसेच वीस वेळा आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार, पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार
त्यांनी आपल्या कारकिर्दीत मिळवले होते.

 

 

Web Title :- K Viswanath Passes Away | legendary telugu director k viswanath passes away

 

हे देखील वाचा :

Raju Dravid Passes Away | शिवछत्रपती पुरस्कार विजेते खो-खोपटू राजू द्रविड यांचे निधन

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Yash Chopra | ‘या’ दिवशी होणार ‘The Romantics’ ही सीरिज प्रदर्शित; यश चोप्रांच्या आयुष्याला मिळणार उजाळा

 

Related Posts