IMPIMP

Yash Chopra | ‘या’ दिवशी होणार ‘The Romantics’ ही सीरिज प्रदर्शित; यश चोप्रांच्या आयुष्याला मिळणार उजाळा

by nagesh
Yash Chopra | documentary series on father of romance director late yash chopra will be released on netflix

बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्यावर बनलेला एक माहितीपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर आधारलेल्या ‘द रोमँटिक्स ‘ या सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्यांनी यश चोप्रा यांच्यासोबत काम केलाय ते त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. (Yash Chopra)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सिरीजमध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं ?, त्यांनी एवढं नाव कसं कमावलं ?अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. या ट्रेलरमध्ये आपल्याला शाहरुख खान, आमिर खान, ऋषि कपूर, अमिताभ बच्चनपासून रणवीर सिंग, हृतिक रोशन अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, भूमी पेडणेकरसारखे कलाकार यश चोप्रा यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत.

 

 

व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्त ‘द रोमँटिक्स ‘ ही सीरिज 14 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचं दिग्दर्शन स्मृती मुंध्रा यांनी केलं आहे. ट्रेलरमध्ये यश चोप्रा (Yash Chopra) यांचा मुलगा आदित्य चोप्राचा देखील आवाज ऐकू येतो. आदित्य चोप्राने 1995मध्ये मुलाखत दिली होती. आता त्यानंतर त्याची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘द रोमांटिक्स’ या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता अनेक नेटकरी ही सीरिज चालू होण्याची वाट बघत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Yash Chopra | documentary series on father of romance director late yash chopra will be released on netflix

 

हे देखील वाचा :

Sonam Kapoor | “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितला आपल्याबाबत घडलेला धक्कादायक प्रसंग

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Shamita Shetty H’Bday | शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खाजगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी

 

Related Posts