IMPIMP

Kashmiri Pandits | काश्मिरी पंडितांना 7 वर्षात मिळाली 17 % घर; केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आकडेवारी

by nagesh
Kashmiri Pandits | only 17 percent of household work completed for kashmiri pandits central government

नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या आठवडाभरापासून द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ३० वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits) पलायन करावं लागलं होतं. त्यांच्यावर जे अत्याचार झाले त्यावर या चित्रपटातील कथानक आहे. त्यामुळे या चित्रपटावरून देशात राजकारण सुरू झाले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैऱ्या झडत आहेत. यामध्येच आता गेल्या सात वर्षात काश्मिरी पंडितांसाठी किती घरे बांधली गेली याची आकडेवारी समोर आली आहे. (Kashmiri Pandits)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी नुकताच काश्मीर दौरा केला. त्यावेळी त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केलीच पण त्याचबरोबर काश्मिरी पंडितांच्या पुर्नवसन प्रक्रियेचा आढावाही घेतला. या आढावा दरम्यान, यावेळी धक्कादायक आकडेवारी समोर आली. गेल्या सात वर्षात काश्मिरी पंडितांसाठी जेवढी घरे प्रस्तावित केली होती त्यापैकी केवळ १७ टक्के घरांचं काम पूर्ण झाल्याचे समोर आलं. (Kashmiri Pandits)

 

यासंदर्भात द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार काश्मिरी पंडितांसाठी २०१५ मध्ये ६ हजार ट्रान्झिट घरांची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २५ घर पूर्ण झालेल्या स्थितीत आणि निर्माणाधीन अवस्थेत आहेत. तर ५० टक्क्यांहून अधिक घरांचं काम सुरू झालेलं नाही. २०१५ मध्येच केवळ घरे नाही तर केंद्र सरकारने प्रधानमंत्री विकास पॅकेजच्या अंतर्गत काश्मिरी निर्वासितांसाठी ३ हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात १ हजार ९८ जणांची निवड करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी मनमोहन सिंग सरकारने २००८ मध्ये काश्मिरी निर्वासितांसाठी रोजगार पॅकेजची घोषणा केली होती. त्यामध्येही ३ हजार नोकऱ्यांचा उल्लेख होता. पैकी २ हजार ९०५ पदं भरली गेली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काश्मिरी निर्वासितांच्या घरांसदर्भात प्रश्न विचारला होता.
त्याला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, २०२३ पर्यंत काश्मिरी निर्वासितांसाठी बांधली जाणारी घरं पूर्ण होतील.
सध्या एक हजार ४८८ घरांचं काम पूर्ण होणे बाकी आहे. विविध टप्प्यांमध्ये घरांचं बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Kashmiri Pandits | only 17 percent of household work completed for kashmiri pandits central government

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | बंगल्यावरील ‘हातोड्या’ची कारवाई टाळण्यासाठी नारायण राणेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Indian Railways | एका महिन्यात एका IRCTC यूजर आयडीवरून बुक करू शकता 12 तिकिट, जाणून घ्या प्रोसेस

Multibagger Stocks | ‘या’ शेयरने दिला जबरदस्त रिटर्न ! 52 दिवसातच 44 रुपयांचे झाले रू. 530, तुम्ही खरेदी केला आहे का ?

 

Related Posts