IMPIMP

Kharghar Heat Stroke Case | उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंगलप्रभात लोढांनी दिली माहिती, म्हणाले- ‘यापुढे…’

by nagesh
Kharghar Heat Stroke Case | kharghar heatstroke incident maharashtra bhushan award mangalprabhat lodha decision

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Kharghar Heat Stroke Case | ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आलं. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. परंतु, या कार्यक्रमानंतर उष्माघातामुळे (Heat Stroke) तब्बल 14 जणांचा मृत्यू (Death) झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरून (Kharghar Heat Stroke Case) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मृत्यूप्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारने (State Government) घ्यावी, असी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खारघर मधील कार्यक्रम भर दुपारी घेतल्यामुळेच उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा (Kharghar Heat Stroke Case) त्रास झाला आणि त्यातून श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच, कार्यक्रमाची वेळ निवडण्यातच आयोजकांनी आणि राज्य सरकारने चूक केल्याचंही सांगितलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना दिली.

 

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले, भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

 

खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्य़क्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी याचे पालन केले पाहिजे, असेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Kharghar Heat Stroke Case | kharghar heatstroke incident maharashtra bhushan award mangalprabhat lodha decision

 

हे देखील वाचा :

Pune PMC News – TDR | पुणे महानगरपालिका : समाविष्ट गावांमध्ये टीडीआर वापरास परवानगी दिल्याने टीडीआर ला सुगीचे दिवस

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सायबर पोलिस स्टेशन – फेसबुक फ्रेंडच्या नावाने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

Pune RTO News | पुणे आरटीओ कार्यालय : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

 

Related Posts