IMPIMP

Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury | ‘किरीट सोमय्यांची जखम ही दाढी करताना झाल्यासारखी’; किशोरी पेडणेकरांनी सोमय्यांना डिवचलं!

by nagesh
Kishori Pednekar | former mumbai mayor kishori pednekars mother-in-law died of heart attack

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury | राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर हल्ला झाला. यामध्ये सोमय्यांना दुखापत (Injury) झाली होती, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्राचं भाजप शिष्टमंडळ हल्ल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी दिल्लीला गेलं आहे. अशातच यावर बोलताना शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या (Mumbai) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांच्या (Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury) जखमेची खिल्ली उडवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मी किरीट सोमय्या यांची जखम पाहिली असून ती सुपरफिशीअल वाटते. दगड मारल्यानं जखम झाली असती तर रक्त येत राहिलं असतं.
जर काच लागली असती तर ती अडकली असती, दाढी करताना अशा प्रकारची जखम होण्याची शक्यता असल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांवर (Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury) निशाणा साधला.

 

सोमय्या जे घडलं ते सांगायला दिल्लीत (Delhi) गेले ते ठीक आहे पण येताना कलह आणू नका, सुबत्ता घेऊन या, असं पेडणेकर म्हणाल्या.
त्यासोबतच इथं अनेक पथकं यायचं असेल तर येऊ दे, कारण इथं अशी अनेक पथकं आलीत.
दिल्लीचा आधार महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबईला मिळत नसल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, स्पेशल टीम (Special Team) पाठवून झालेल्ला हल्ल्याची चौकशी करावी
आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)
यांच्या राजीनाम्याची मागणी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये आपल्या शिष्टमंडळासह केली आहे.

 

Web Title :-  kirit somaiya met union home secretary kishori pednekar criticized

 

हे देखील वाचा :

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; साडे तीन लाखांचे 11 पिस्टल जप्त (व्हिडिओ)

Pune Land survey | खुशखबर ! आता पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी अवघ्या 30 मिनिटांत

 

Related Posts