IMPIMP

Pune Land survey | खुशखबर ! आता पुणे जिल्ह्यात जमीन मोजणी अवघ्या 30 मिनिटांत

by nagesh
Pune Land survey | Good news! Now land survey in Pune district in just 30 minutes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Land survey | पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोणत्याही जमिनीची मोजणी (Pune Land survey) आता 30 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी 11 रोव्हर मशिन (Rover Machine) भूमि अभिलेख विभागाकडे (Department of Land Records) दाखल झाल्या आहेत. या मशिनच्या सहायाने अचूक आणि अगदी कमी वेळेत मोजणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरून वाट पाहणे आता कमी होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यामध्ये 77 ठिकाणी कॉर्स (Continuous Operation Reference Station) उभारले आहे. या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ तीस सेकंदात घेता येते. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह (Reading Rover Receive) करणार असून हे रीडिंग टॅबमध्ये दिसणार आहे. हे रोव्हर खरेदी करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीकडून (Pune District Planning Committee) 2 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यामधून 35 रोव्हर खरेदी केले गेले. पहिल्या टप्प्यामध्ये अकरा रोव्हर प्राप्त झालेत. एका रोव्हरमुळे रोज 4 ते 5 ठिकाणच्या मोजणी पूर्ण होणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये जमिनीची मोजणी गती वाढणार असून मोजणीची प्रक्रिया अतिशय कमी वेळेमध्ये तसेच अचूक होणार असल्याचं दिसते. (Pune Land survey)

 

भूमी अभिलेख विभाग पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज (Kishor Tavrej) यांनी सांगितलं की, ”पुणे जिल्ह्याला 11 रोव्हर मशिन प्राप्त झाल्या आहेत.
त्यासाठी शंभर कर्मचाऱ्यांना या रोव्हरच्या माध्यमातून मोजणी कशी करावी, याचे प्रशिक्षण देण्यात आलेय.
बाकी 24 मशिन लवकरच येतील. त्यामुळे मोजणीचे काम गतिमान आणि अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.
तसेच एका मोजणी केल्यानंतर भविष्यात पुन्हा त्या जमिनीची मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर मोजणीची गरज पडणार आहे.
पैसे भरल्यानंतर कोर्डीनेटवरून मोजणीची प्रत लगेच उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचं,” सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Pune Land survey | Good news! Now land survey in Pune district in just 30 minutes

 

हे देखील वाचा :

Healthy Breakfast Ideas | सकाळचा नाश्ता न केल्याने होते ‘हे’ गंभीर नुकसान, हेल्दी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा ब्रेकफास्टमध्ये समावेश

Benefits Of Sunlight | सूर्यप्रकाश, Vitamin D व्यतिरिक्त ‘या’ फायद्यांबद्दल जाणून घेणे आवश्यक

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह 7 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराखाली गुन्हा दाखल

 

Related Posts