IMPIMP

Kisan Credit Card Loan Scheme | शेतकऱ्यांना खूशखबर ! ‘या’ पध्दतीनं सहजरित्या कर्ज मिळवा, बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही; जाणून घ्या

by nagesh
Kisan Credit Card Loan Scheme | farmers will get credit cards from the central government for crop loans

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kisan Credit Card Loan Scheme | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) देशातील शेतकऱ्यांसाठी (Good News For Farmers) महत्वाची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना आपल्या पीक कर्जासाठी (Crop Debt) सरकारकडून क्रेडीट कार्ड (Credit Card) मिळणार आहे. याद्वारे आता शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागणार नाही. बँकेत न जाता थेट कर्ज मिळवता येणार आहे. या कारणामुळे आता शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा ताप वाचणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंतप्रधान सन्मान योजनेमधील (PM Samman Nidhi) लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड (Kisan Credit Card) मिळणार आहे. या कार्डचा कार्यकाल 3 वर्षाचा असणार आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना या कार्डवरुन दोन वेळा कर्ज घेता येणार आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वित्तसंस्थेत जागेच्या सातबारा उताऱ्याची माहिती द्यावी लागणार आहे. (Kisan Credit Card Loan Scheme)

 

कार्डमध्ये शेतीची सविस्तर नोंद असणार –
या कार्डात शेतकऱ्याच्या शेतीची सविस्तर नोंद असणार आहे. त्याने गतवर्षी कोणते पीक घेतले. किती कर्ज घेतले, त्यामधील किती फेडले त्याचबरोबर किती बाकी आहे. नव्याने कोणते पीक घ्यायचे आहे. याची माहिती या कार्डमध्ये असणार आहे. तसेच, शेतकऱ्याच्या कर्जाची पीकनिहाय वार्षिक मर्यादा त्यावरुन ठरणार आहे. तितक्या मर्यादेचे कर्ज त्या शेतकऱ्याला कार्ड दाखवल्यास मिळेल.

 

Web Title :- Kisan Credit Card Loan Scheme | farmers will get credit cards from the central government for crop loans

 

हे देखील वाचा :

Pune Crime | स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! जस्ट डायलवर चौकशी केली की मिळत होता Merian Body Spa चा ‘मेसेज’

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

MNS MLA Raju Patil | ‘धनंजयराव, ….म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते’; मनसे आमदार राजू पाटलांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला !

 

Related Posts