IMPIMP

MNS MLA Raju Patil | ‘धनंजयराव, ….म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते’; मनसे आमदार राजू पाटलांचा धनंजय मुंडेंना खोचक टोला !

by nagesh
MNS MLA Raju Patil | mns mla raju patil criticized maharashtra minister and ncp leader dhananjay munde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS MLA Raju Patil | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ असं म्हणत निशाणा साधला होता. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये आता जुंपलेली पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेनंतर मनसे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

धनंजयराव, चौकशांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना ?, तुमच्या बुडाखाली काय जळतंय आणि टोचतंय याची कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे तुमच्या वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येत असल्याचं म्हणत राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. त्यासोबतच मनसे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता.

 

अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’ चा ओम फट स्वाहा करणार आहेत, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार, Get Well Soon धनंजय मुंडे, असंही खोपकर म्हणाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय म्हणाल होते धनंजय मुंडे ?
पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे.
अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अशाच प्रकारे रामदास पाध्येच्या तोंडून एक अर्धवटराव बोलत आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

 

Web Title :- MNS MLA Raju Patil | mns mla raju patil criticized maharashtra minister and ncp leader dhananjay munde

 

हे देखील वाचा :

Tata IPL 2022 | दिल्ली कॅपिटल्सला सामन्याआधी मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

PMC Property Tax | मिळकतकरातील 40 टक्के सवलत रद्द ! 2018 पासून दिलेल्या सवलतीच्या आकारणीमुळे ‘अव्वाच्या सव्वा’ बिलांमुळे पुणेकर मेटाकुटीस; सर्वच राजकिय पक्ष मूग गिळून बसल्याने पुणेकर हवालदील

Pune Metro | स्वारगेट ते कात्रज या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल प्रकल्पास ठाकरे सरकारची मान्यता !

 

Related Posts