IMPIMP

Leopard In Pune | वारजे माळवाडी परिसरातील न्यू अहिरे गावात शिरलेला बिबट्या तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर बेशुद्ध

by nagesh
 Leopard In Pune | A leopard that entered New Ahire village in Warje Malwadi area is unconscious after 2 hours of trying.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Leopard In Pune | शहरातील भर वस्तीचा भाग असलेल्या वारजे माळवाडी (Warje Malwadi) परिसरातील न्यू
अहिरे गावात (New Ahire Gaon) शिरलेल्या बिबट्याला तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर बेशुद्ध करण्यात वन विभागाला (Forest Department) यश
आले आहे. या बिबट्याला आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयात (Katraj Zoo) नेण्यात येणार आहे. (Leopard In Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एनडीए परिसराला (NDA Pune) लागून असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे सोमवारी सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. (Pune Crime News)

 

 

ही बाब काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती.
बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो वांजळे यांच्या गार्डनमध्ये गेला. त्यानंतर तो पुन्हा परत कडबा कुट्टी मशीनमधील एका वाहनाखाली बराच वेळ लपला होता. त्यानंतर मशीन जवळील एका गोदामात तो गेला. बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यु टीम, वारजे पोलीस घटनास्थळी (Warje Malwadi Police) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मोठी जाळी गोदामाच्या दरवाजाच्या जवळ लावली. पण बिबट्याने तेथून पळ काढला. (Leopard In Pune)

त्यानंतर एका इमारतीच्या बाजूला असलेल्या झाडात तो दिसला. तेव्हा वन विभागाच्या पथकाने सकाळी सव्वा नऊ वाजता डॉट मारुन त्याला बेशुद्ध केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बिबट्याला पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलीस आणि रेस्क्यु टिमला
ऑपरेशन करणे अवघड जात होते. सुदैवाने बिबट्याला पकडण्यात लवकर यश मिळाल्याने
कोणावरही त्याने हल्ला केला नाही.

 

Web Title :  Leopard In Pune | A leopard that entered New Ahire village in Warje Malwadi area is unconscious after 2 hours of trying.

 

हे देखील वाचा :

Tax For Illegal Constuction In Pune | बीडीपी, हिलटॉप हिलस्लोप वरील अनधिकृत बांधकामांमुळे ‘शास्तीकर’ माफीचा निर्णय लांबण्याची शक्यता

Chandrakant Patil | संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – चंद्रकांत पाटील

Eknath Khadse | ‘बावनकुळे स्पष्ट बोलणारा माणूस…’ एकनाथ खडसेंनी बानवकुळेंच्या ‘त्या’ विधानावरुन शिवसेनेला डिवचलं

 

Related Posts