IMPIMP

LIC New Pension Plan | LIC ने लाँच केला शानदार प्लान ! केवळ एकदाच जमा करा पैसे, आयुष्यभर मिळेल पेन्शन; येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

by nagesh
LIC | lic notice for policy holders fake information with regard to penalty charges for kyc update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC New Pension Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सरल पेन्शन योजना सुरू केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम स्कीम आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते (LIC New Pension Plan).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विमा नियामक IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही तात्काळ वार्षिक योजना आहे. एलआयसीने या पॉलिसीबद्दल सांगितले की, या प्लॅनमध्ये सर्व जीवन विमा कंपन्यांसाठी समान अटी आणि नियम आहेत. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध अ‍ॅन्युइटी पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतो. या योजनेत पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कर्ज घेता येते. (LIC New Pension Plan)

 

सरल पेन्शन योजनेचा पहिला पर्याय

एलआयसी सरल पेन्शन योजना निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला, लाइफ अ‍ॅन्युइटीसह 100% खरेदी मुल्याचा रिटर्न. ही पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजेच, पेन्शन जोडीदारांपैकी एकाशीच संबंधीत राहील, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर पॉलिसी घेण्यासाठी भरलेला मूळ प्रीमियम त्याच्या नॉमिनीला परत केला जाईल.

 

सरल पेन्शन योजनेचा दुसरा पर्याय

दुसरा पर्याय जॉईंट लाइफसाठी दिला आहे. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शनने जोडले जाते. यामध्ये जो जोडीदार शेवटपर्यंत जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळत राहते. एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जेवढी पेन्शन मिळते, तेवढीच रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतरही दुसर्‍या जोडीदाराला आयुष्यभर मिळत राहते. जेव्हा दुसरा पेन्शनधारक देखील जग सोडून जातो, तेव्हा नॉमिनीला पॉलिसी घेताना दिलेले मूळ मूल्य दिले जाते.

 

तात्काळ वार्षिकी योजना

एलआयसीची ही योजना तात्काळ वार्षिकी योजना आहे. म्हणजेच पॉलिसी घेताच पेन्शन सुरू होईल. पेन्शनधारकाला दरमहा, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे. कोणताही पर्याय निवडला तरी पेन्शन त्याच पद्धतीने सुरू होईल.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पॉलिसी कशी खरेदी करावी

तुम्ही हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.
www.licindia.in या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येईल.
योजनेची किमान वार्षिकी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे. किमान खरेदी मूल्य वार्षिक मोड, निवडलेले पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून असेल.
या प्लॅनमध्ये कोणतेही कमाल खरेदी मूल्य मर्यादा नाही.
40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.
मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर एका महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.
अशाप्रकारे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3 हजार रुपये गुंतवावे लागतील.

 

Web Title : –  LIC New Pension Plan | lic launched a great plan deposit money only once pension will be available for life

 

हे देखील वाचा :

ACB Trap | पोलीस ठाण्याच्या आवारात 2 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Pavana Dam | दुर्दैवी ! पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू

Shivsena | बालेकिल्ल्यातही शिवसेनेला खिंडार ? आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचा मोठा झटका

 

Related Posts