IMPIMP

ACB Trap | पोलीस ठाण्याच्या आवारात 2 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap | kolhapur police constable arrested while accepting bribe in police station premises

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन ACB Trap | अटक वॉरंट (Arrest Warrant) निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला (Constable) कोल्हापूर एसीबीने (Kolhapur ACB Trap) रंगेहात पकडले. नामदेव औदुंबर कचरे Namdev Audumbar Kachare (वय – 36) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही कारवाई आज (शुक्रवार) दुपारी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हातकणंगले येथील एका व्यावसायिक असलेल्या मॅकेनिकल (Mechanical) विरोधात धारवाड न्यायालयात (Dharwad Court) खटला दाखल आहे. न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित मॅकेनिकल, तक्रारदार हजर राहत नव्हते. त्यामुळे धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते. संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी मॅकेनिकल तक्रारदाराच्या घरी गेले. परंतु पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अटक वॉरंट प्रकरणात मदत करतो असे सांगून दोन हजार रुपये लाच मागितली (Demanding Bribe).

 

तक्रारदाराने कोल्हापूर एसीबीकडे (ACB Trap) लेखी तक्रार केली. आज सकाळी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना पथकाने कचरे याला रंगेहात पकडले. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या (Hatkanangle Police Station) परिसरातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कचरे याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

 

ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwan)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar),
पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर (PSI Sanjeev Bambergekar), पोलीस अंमलदार शरद पोरे,
विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  ACB Trap | kolhapur police constable arrested while accepting bribe in police station premises

 

हे देखील वाचा :

Pavana Dam | दुर्दैवी ! पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू

Shivsena | बालेकिल्ल्यातही शिवसेनेला खिंडार ? आदित्य ठाकरेंना शिंदे गटाचा मोठा झटका

Curd For Hair | महागड्या हेअर प्रॉडक्टऐवजी केसांना लावा दही, ‘हे’ 5 फायदे जाणून घेतले तर दररोज वापराल

 

Related Posts