IMPIMP

Local Train Ticket Prices | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आजपासून AC लोकलचा प्रवास स्वस्त, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात घट

by nagesh
Local Train Ticket Prices | ac local travel cheaper today first class first class ticket prices lower

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Local Train Ticket Prices | रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passenger) एक महत्वाची माहिती आहे. मध्य, आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवर (Central And Western Suburban Railways) धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा (AC Local) प्रवास आता स्वस्त होणार आहे. वातानुकूलित (AC) लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात केली आहे. त्याचबरोबर विना वातानुकूलित म्हणजेच सामान्य लोकलच्या (Normal local) प्रथम श्रेणीचेही दर (Local Train Ticket Prices) कमी केले आहे. परंतु, वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीचे पास दर मात्र तसेच आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेल्वे प्रशासनाच्या (Railway Administration) माहितीनुसार, एसी लोकलच्या दराबाबत रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याची अमंलबजावणी आजपासून म्हणजेच 5 मेपासून (May-5) होणार आहे. AC च्या तिकीट दरात कपात केल्याने चर्चगेट ते बोरिवलीचे (Churchgate to Borivali) सध्याचे तिकीट 180 रुपयांहून 95 रुपये, तर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडेदर 140 रुपयांवरून 85 रुपये झालेय. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत (CSMT To Kalyan) वातानुकूलितचे तिकीट 105 रुपये झाले. आधी हा दर 210 रुपये होता. या मार्गावरील प्रथम श्रेणीचे तिकीटही 165 रुपयांऐवजी 100 रुपये आकारले जाईल. (Local Train Ticket Prices)

 

दरम्यान, प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways)
AC लोकलच्या तिकीट दरात पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचेही भाडे दर कमी केले.
या दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) वातानुकूलित लोकलमधून एप्रिलमध्ये
रोज 22 हजार प्रवासी प्रवास करत असून मार्च 2022 च्या तुलनेत 43 टक्केच वाढ आहे.
एप्रिलमध्ये पश्चिम रेल्वेला AC लोकलमधून रोज दहा लाख 13 हजार रुपयांचा महसूल मिळाला.
एप्रिलमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बरवरील AC लोकलमधून रोज सरासरी
वीस हजार पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असून 9 लाखांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

 

Web Title :- Local Train Ticket Prices | ac local travel cheaper today first class first class ticket prices lower

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)

 

Related Posts