IMPIMP

Maggi बनवणाऱ्या कंपनीने केले मान्य, म्हणाले – ‘होय, आमचे 60 टक्क्यांहून अधिक प्रोडक्ट्स अनहेल्दी’

by omkar

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – घरी जेंव्हा खायला काही नसते किंवा काहीतरी वेगळ आणि झटपट बनता येईल, असे खाण्याची इच्छा असते. अशावेळी आपण मॅगी नूडल्सला प्राधान्य देतो. ही मॅगी नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.  त्यातच आता Maggie बाबतचा एक विचार करायला लावणारा रिपोर्ट समोर आला आहे.

Maggie बनवणाऱ्या नेस्ले कंपनीचा एक अंतर्गत रिपोर्ट आहे. रिपोर्टमध्ये कंपनीने मान्य केले आहे की, नेस्ले कंपनीचे 60 टक्क्यांहून अधिक फूड आणि ड्रींक प्रोडक्ट्स हे अनहेल्दी आहेत.

ते अधिक हेल्दी बनवण्यावर सध्या काम सुरु आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक

नेस्ले, Maggie नूडल्स, किटकॅट अन् नेस्कॅफे बनवणाऱ्या नेस्लेने एका इंटरनॅशनल डॉक्यूमेंटमधून या गोष्टीला मान्य केले आहे.

तसेच त्यांचे 60 टक्क्यांहून अधिक खाद्य आणि पेय उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक नाहीत.

जगातील सर्वांत मोठ्या फूड कंपनीने हे देखील मान्य केले आहे ; त्यांची काही खाद्य उत्पादने कधीच हेल्दी असणार नाहीत.

UK बिजनेस डेली फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की,

‘ऑस्ट्रेलियाच्या हेल्थ स्टार रेटींग सिस्टीमनुसार नेस्लेच्या केवळ 37 टक्के फूड आणि पेय प्रोडक्ट्सचं रेटींग 3.5 हून अधिक होते.’

या सिस्टीमनुसार, फूड प्रोडक्ट्सना 5 पैकी गुण दिले जातात.  मात्र, कंपनीच्या पाणी आणि डेअरी प्रोडक्ट्सची कामगिरी उत्तम आहे.

या अहवालाला उत्तर देताना नेस्ले SA च्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आमची उत्पादने त्यांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करतात आणि संतुलित आहारासाठी मदत करतात.

यासाठीच कंपनी सध्या काम करत आहे.

कंपनीने म्हटले आहे की, आम्ही गेल्या दोन दशकांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि मीठ लक्षणीय प्रमाणात कमी केले आहे.

अलीकडच्या काही वर्षांत आम्ही पौष्टिक मानकांची पूर्तता करणारी हजारो उत्पादने मुलांसाठी आणि कुटूंबासाठी बाजारात आणली आहेत.

Related Posts