IMPIMP

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई  : सरकारसत्ता ऑनलाईन – सत्तेवर येताच शिंदे-फडणवीस सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत राज्यात ७५ हजार सरकारी नोकर भरती होणार असल्याचे जाहीर केले होते. (Maharashtra Government Recruitment) त्यासाठी विविध खात्यांमधील रिक्त जागांची माहिती देखील मागविण्यात आली होती. काही खात्याच्या जाहीराती देखील यासंबंधी प्रसिध्द झाल्या असून लवकरच याबाबत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ७५ हजार जागांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार एक समिती गठीत करणार असल्याचे समजते. तसेच यासंबंधीची चर्चा देखील मंत्रीमंडळ बैठकीत झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर ही समिती काम करणार आहे. (Maharashtra Government Recruitment)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात एवढी मोठी नोकरभरती करत असताना ऑनलाईन परिक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे यासंदर्भात संबंधित कंपन्यांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. जिल्हा निवड समिती भंडारा यांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. ही नोगरभरती यशस्वीपणे राबविण्यासाठी राज्य सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या नामांकित कंपन्यांची निवड केली आहे. मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परिक्षा केंद्र आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. (Maharashtra Government Recruitment)

 

भंडारा जिल्ह्याबरोबरचं राज्यातल्या अनेक ठिकाणी या दोन्हीही कंपन्यांचे सेंटर नाहीत.
त्यामुळे परीक्षा घ्यायच्या कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीसाठी राज्यभरातून जवळपास 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची क्षमता मात्र दोन्हीही कंपन्यांची एवढी क्षमता नाही. टीसीएस कंपनी एकावेळी राज्यात 7500 ते 8000 पर्यंत उमेदवारांची परीक्षा घेऊ शकते तर आयबीपीएस कंपनी दहा हजार ते पंधरा हजार एका वेळी एका शिफ्टमध्ये परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे या कंपन्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त अर्ज आले तर परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदस्य सचिव जिल्हा निवड समिती भंडारा यांनी ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून माहिती दिली कळवली आहे. त्यामुळे राज्यातील 75 हजार नोकर भरती रेंगाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

याचे कारण एकाच वेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या दोन्ही नियुक्त कंपन्या एकाच वेळी परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75 हजार पदांच्या भरतीच्या वेग मंदावण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील विविध विभागात आहेत एवढ्या जागा रिक्त:

गृहविभाग- ४९ हजार ८५१

सार्वजनिक आरोग्य विभाग : २३ हजार ८२२

जलसंपदा विभाग : २१ हजार ४८९

महसूल आणि वन विभाग : १३ हजार ५५७

वैद्यकीय शिक्षण विभाग : १३ हजार ४३२

सार्वजनिक बांधकाम विभाग : ८ हजार १२

आदिवासी विभाग : ६ हजार ९०७

सामाजिक न्याय विभाग : ३ हजार ८२१

 

Web Title :- Maharashtra Government Recruitment | maharashtra govt recruitment a committee will be formed for the recruitment of 75 thousand jobs

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | भाऊ नाही बाबु बोलायचं असे म्हणत एकाला बेदम मारहाण, पिंपरीतील घटना

Navneet Rana | हनुमान चालिसा प्रकरण : दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याची विशेष कोर्टात धाव

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांच्या आव्हानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘सरकारमधले जे अतिशहाणे मंत्री आहेत त्यांनी…’

 

Related Posts