IMPIMP

Maharashtra IPS Transfer | आयपीएस अनिल पारसकर, अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, शशिकुमार मीना, प्रविण पाटील, अरविंद चावरिया यांच्यासह 10 जणांना पोलिस उप महानिरीक्षक पदी बढती

IPS दीपक साकोरे नवी मुंबईचे नवे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे)

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra IPS Transfer | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) सोमवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी अनिल पारसकर (IPS Anil Paraskar), अभिनव देशमुख (IPS Dr. Abhinav Deshmukh), सारंग आव्हाड (IPS Sarang Awad), प्रविण पाटील (IPS Pravin Patil), अरविंद चावरिया (IPS Arvind Chavaria) यांच्यासह 10 आयपीएस अधिकार्‍यांना पोलिस उप महानिरीक्षक (अप्पर पोलिस आयुक्त) पदी बढती देण्यात आली आहे. पदोन्नतीवर त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिस उप महानिरीक्षक असलेले दीपक साकोरे (IPS Deepak Sakore) आणि पोलिस उप महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा (IPS Veerendra Mishra) यांची अनुक्रम बदली आणि नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IPS Transfer)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बदली झालेल्या पोलिस उप महानिरीक्षकाचे नव आणि त्यापुढील कंसात पदस्थापना पुढील प्रमाणे

1. विरेंद्र मिश्रा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई)

2. दीपक साकोरे (पोलिस उप महानिरीक्षक, रा.रा. पोलिस बल, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई)

 

पदोन्नतीवर बदली झालेल्या पोलिस अधीक्षकांचे नाव आणि त्यापुढील कंसात पदोन्नतीचे पद आणि पदस्थापना पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra IPS Transfer)

1. अभिनव डी. देशमुख (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

2. अनिल एस पारसकर (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

3. एम. रामकुमार IPS M. Ramkumar (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)

4. शशिकुमार मीना IPS Shashi Kumar Meena (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र.8, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

5. प्रवीण सी. पाटील (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 1, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर)

6. संजय बी. पाटील IPS Sanjay B. Patil (पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर)

7. वसंत के. परदेशी IPS Vasant K. Pardeshi (समादेशक, रा.रा. पोलिस बल, गट क्र. 7, दौंड, जि. पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

8. सारंग डी. आव्हाड (पोलिस अधीक्षक, बुलढाणा ते पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

9. पी. पी. शेवाळे IPS P.P. Shewale (कार्यकारी संचालक (सु. व अ.), मराविवि कंपनी मर्या, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर)

10. अरविंद एच. चावरिया (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते अप्पर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर यांची पदोन्नतीवर बदली ! पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून प्रविण पाटील व अरविंद चावरिया यांची नियुक्ती

Maharashtra IPS Transfer | सीपी निखील गुप्ता यांची बदली ! मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलिस आयुक्त तर डी.एस. चव्हाण छ. संभाजीनगर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक

 

Related Posts