IMPIMP

Maharashtra Phone Tapping Case | फोन टॅपिंगप्रकरणात धक्कादायक खुलासा ! ‘एस. रहाटे’ आणि ‘खडासने’ या बोगस नावाचा वापर, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
IPS Rashmi Shukla | ajit pawar slams cm eknath shinde phone tapping case maharashtra assembly winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन फोन टँपिंग प्रकरणामध्ये (Maharashtra Phone Tapping Case) वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याची माहिती आहे. फोन टॅपिंग करताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे बनावट नाव ‘एस. रहाटे’ आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे बनावट नाव ‘खडासने’ असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे बनावट नावे वापरताना या लोकांच्या नावांशी संलग्न नावांचा उल्लेख करण्यात आला होता. (Maharashtra Phone Tapping Case)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Maharashtra Phone Tapping Case) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सीआरपीसी कलम 164 अंतर्गत सहा जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आला आहे. या 6 जणांत त्यावेळच्या एसीएस होम (ACS Home) आणि डीवायएसपी (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, हे तेच डीवायएसपी आहेत जे त्यावेळी राज्य गुप्तचर विभागामध्ये State Intelligence Department (SID) तैनात होते आणि त्यांना टॅपिंगची माहिती होती. तर, फोन टॅपिंग करताना संजय राऊत आणि एकनाथ खडसेंच्या नावांऐवजी बोगस नावांचा वापर करण्यात आला होता. असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन ‘समाजविघातक घटक’ या नावाखाली टॅप होत होते.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (SID) तपासात एक पत्र समोर आलं होतं.
गृहविभागाच्या सचिवांना फोन टॅपिंगच्या परवानगीसाठी लिहिलेल्या या पत्रात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन नंबर होते.
परंतु, त्यांच्या नावापुढे नावे न देता समाजविघातक घटक असे नमूद करण्यात आले होते, याबाबत माहिती समोर आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा दोन वेळा जबाब नोंदवण्यात आला होता.
त्याचबरोबर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचा देखील जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.

 

Web Title :- Maharashtra Phone Tapping Case | Maharashtra phone tapping case IPS Rashmi Shukla used bogus names information of sources for sanjay raut s rahate and eknath khadse mentions with this name

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चक्क मोबाईल टॉवर गेला चोरीला ! मॉडेल कॉलनी, पाषाणमधील मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँकसह साहित्य चोरीला

Diets To Prevent Liver Disorders | यकृताचे विकार टाळण्यासाठी ‘हे’ पथ्ये पाळणे आवश्यक; जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar On Maharashtra Load Shedding | अजित पवारांकडून मोठा दिलासा, म्हणाले – ‘…पण, राज्यात भारनियमन होऊ देणार नाही’

 

Related Posts