IMPIMP

Pune Crime | चक्क मोबाईल टॉवर गेला चोरीला ! मॉडेल कॉलनी, पाषाणमधील मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँकसह साहित्य चोरीला

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू अथवा घरात शिरुन चोरटे चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. पण, मोबाईल टॉवर (Mobile Tower), डिझेल जनरेटर बॅटरी बँक (Diesel Generator Battery Bank) व इतर साहित्य असा २७ लाखांहून अधिक किंमतीचा माल राजरोजपणे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी देवेंद्र कुंभलकर (वय ४१, रा. वडगाव शेरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र कुंभलकर हे जीटीएल कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. कंपनीने पाषाण (Pashan, Pune) येथील सं. नं. १२१ हाऊस आणि प्लॉट नं. २ येथे मोबाईल टॉवर उभारले होते. त्या जागेवर कोणीतरी अतिक्रमण करुन तेथील संपूर्ण मोबाईल टॉवर, डिझेल जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे असा २० लाख १९ हजार ७५९ रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार एप्रिल २०२१ मध्ये घडला होता.

 

त्याचप्रमाणे मॉडेल कॉलनीतील (Model Colony Pune) कुसाळकर निवास येथे मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे असा ६ लाख २८ हजार ९१० रुपयांचे साहित्य कोणीतरी चोरुन नेले.
हा प्रकार जानेवारी २०२१ मध्ये घडला होता हे मोबाईल टॉवर कसे चोरीला गेले कोणी चोरले.
हे मोबाईल टॉवर कधीपासून बंद पडले, याविषयी काहीही माहिती कंपनीकडून पोलिसांना देण्यात आलेली नाही.
कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा (FIR Registered By Court Order) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | mobile tower was stolen Material including model colony mobile tower in pashan generator battery bank

 

हे देखील वाचा :

Diets To Prevent Liver Disorders | यकृताचे विकार टाळण्यासाठी ‘हे’ पथ्ये पाळणे आवश्यक; जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar On Maharashtra Load Shedding | अजित पवारांकडून मोठा दिलासा, म्हणाले – ‘…पण, राज्यात भारनियमन होऊ देणार नाही’

Maharashtra Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ

 

Related Posts