IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’; मनसेचा खोचक टोला

by nagesh
MNS On Shivsena | mns gajanan kale slams shivsena uddhav thackeray ncp over dasara melava

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आले. शिवसेनेला पक्ष आणि राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशावेळी कैचीत सापडलेल्या शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) सोडलेली नाही. मनसेने या बंडखोरीवरून शिवसेनेवर खोचक टीका करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील आज शिंदे गटात सहभागी झाले. सकाळपासून सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर उदय सामंत सूरतमार्गे गुवाहाटीला गेल्याचे समजले. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत.

 

मंत्री सामंत हे सुद्धा शिंदे गटात गेल्याने मनसेच्या खोपकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, थेट पक्षप्रमुखांनाच केले नापास, उतरवला शिवसेनेचा गणवेष, उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतला गुवाहाटीच्या शिंदे कॉलेजमध्ये प्रवेश. (Maharashtra Political Crisis)

 

 

यानंतर खोपकर यांनी आणखी दोन ट्विट केली आहेत.
यापैकी एका ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करताना म्हटले आहे की, शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर दिली होती.
पण, बाबा ओरडतील ! म्हणून नाही आला.
दुसर्‍या ट्विटमध्ये शिवसेनेवर टीका करताना खोपकर यांनी लिहिले आहे की, एकनाथ शिंदेंसोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे….

 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते की, मी अजूनही शिवसेनेतच आहे.
सध्या एकसंघ राहणे गरजेचे आहे. मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही.
जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझे वैयक्तिक मत आहे.
पण, आता सामंत सुद्धा बंडखोर शिंदे गटात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt maharashtra political crisis the last mla had an offer but mns leader amey khopkar slams shivsena

Related Posts