IMPIMP

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

by nagesh
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray wrote a letter praising the mla saying

गुवाहाटी : वृत्तसंस्था Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीत एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर सत्तास्थापनेसाठी बैठकाचं सत्र सुरू झालं आहे. दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा द्यावा,’ अशी थेट मागणी केसरकर यांनी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

11 जुलैपर्यंत कुठल्याही आमदारावर कारवाई होऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढून घेणारं पत्र 51 आमदारांच्या सहीने राज्यपालांना पाठवण्याच्या तयारीत आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जर राज्यपालांनी हे पत्र स्वीकारलं तर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल सांगू शकतात. त्यामुळे विधानसभेत मुख्यमंत्री ठाकरे यांना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Political Crisis)

 

दरम्यान, “यशवंत चव्हाण (Yashwant Chavan) यांना पंतप्रधान बनण्यासाठी राष्ट्रपतींनी आमंत्रण दिले होते. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी नकार दिला. जर 51 आमदार गुवाहाटीला निघून आले असतील त्याचा अर्थ हे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सन्मानपूर्वक राजीनामा दिला पाहिजे,” अशी थेट मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे.

 

ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ?

शिंदे गटातील बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) कोअर कमिटीची बैठक सुरू आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर शिंदे गट राज्यपालांकडे ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता आहे.
यासाठी शिंदे गट मुंबईत येणार की त्यांचे प्रतिनिधी येणार ? याबाबतची माहिती समोर आली नाही.
दरम्यान, शिंदे गट, महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठा सत्ता पेच पाहायला मिळत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt uddhav thackeray should resign for the first time the shinde group deepak kesarkar made a clear demand

Related Posts