IMPIMP

Maharashtra Politics | राज्यातील पाचही विधानपरिषदेच्या मतदारसंघाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट, नाशिकमध्ये तिरंगी लढत; जाणून घ्या पाच ठिकाणी कशी होणार लढत?

by nagesh
 Maharashtra Politics | nashik graduates constituency satyajeet tambe vs shubhangi patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यातील शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकांमधील (Teacher-Graduate Legislative Council Election) उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे सकाळपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. खासकरून नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik MLC Election) कोणकोणत्या उमेदवारांमध्ये (Maharashtra Politics) लढत होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. परंतु भाजप (BJP) समर्थक धनराज विसपुते (Dhanraj Vispute) आणि धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी माघार घेल्याने नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सत्यजित तांबे (Satyajit Tambe), शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले (Subhash Junglee) यांच्यात लढत होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघ

सोमवारी सकाळपासून शुभांगी पाटील या नॉट रिचेबल होत्या. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते अशी चर्चा होती. त्यामुळे त्या उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अफवा पसरली होती. मात्र, तसे काही घडले नाही. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी मंत्री बबनराव घोलप (Former Minister Babanrao Gholap) यांनी केली. परंतु ठाकरे गटाकडून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहाजणांनी माघार घेतली. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. (Maharashtra Politics)

 

नागपूर शिक्षक मतदारसंघ

नागपूर शिक्षक मतदारसंघातही (Nagpur Teachers Constituency) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाने गंगाधर नाकाडे (Gangadhar Nakade) यांना मैदानात उतरवले होते. परंतु त्यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार नागो गाणार (BJP MLA Nago Ganar) आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होणार आहे. परंतु राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार (NCP Satish Itkelwar) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने या ठिकाणी देखील तिरंगी लढत होत आहे.

 

अमरावती पदवीधर मतदारसंघ

ही जागा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील (Ranjit Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याठिकणी दुहेरी लढत पाहायला मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक मतदार संघातून शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील (Balaram Patil) हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात (Aurangabad Teachers Constituency) राष्ट्रवादीकडून विद्यमान
आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांना पुन्हा संधी दिली आहे.
हा मतदारसंघ मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसमधून आलेले किरण पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

 

शिंदे गटाचा एकही उमेदवार नाही

शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मात्र, पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा (Shinde Group) स्वत:चा
उमेदवार निवडणुकीसाठी उभा नाही. या पाचही मतदारसंघात 30 जानवारीला मतदान होणार आहे.
तर मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | nashik graduates constituency satyajeet tambe vs shubhangi patil

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्याबाबतची ‘ती’ भूमिका चंद्रकांतदादा पाटील यांनीच स्पष्ट करावी – किरीट सोमय्या

Maharashtra Politics | …तर त्यांचं आम्ही स्वागत करु, भाजप नेत्या पंकजा मुंडेंना ठाकरे गटाकडून खुली ऑफर

Aurangabad Crime News | दारुच्या नशेत महिलेची छेडछाड करणाऱ्या औरंगाबाद एसीपीला ‘एवढ्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

Related Posts