IMPIMP

Maharashtra Politics News | शिंदे गटाच्या जागांवर भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अस्वस्थ

by nagesh
Maharashtra Politics News | appointments of chiefs by bjp in shinde group seats too chief minister supporters upset pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा (Lok Sabha Election) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (Maharashtra BJP) तयारी सुरु केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदरसंघ निवडणूक प्रमुखांची (BJP Maharashtra Election Chief) नियुक्ती केली. मात्र यामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) जागांचाही समावेश आहे. भाजपने केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री (Maharashtra Politics News) समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

बावनकुळे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या प्रमुखांवर त्यांना दिलेल्या मतदारसंघाची निवडणूक विषयक सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारांबरोबर नियमीत संपर्क, पक्षाची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्यांची नाव, पत्त्यासहित यादी, पदाधिकाऱ्यांच्या नियमीत बैठका, त्यांच्या कामाचा आढावा अशा कामांची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यातून मतदारसंघात राजकीय शक्ती वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Maharashtra Politics News)

भाजपने जाहीर केलेल्या निवडणूक प्रमुखांमध्ये युती असलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटाकडे (Shinde Group) असणाऱ्या मतदारसंघांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात मावळ (Maval), बारामती (Baramati), शिरुर (Shirur) आणि पुणे (Pune) या चार लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Constituency In Pune District) येतात. यामध्ये मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane) हे शिंदे गटात आहेत. शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) हे देखील शिंदे गटात आहेत त्यामुळे ही जागा शिंदे गट मागणार आहे. भाजपने मावळसाठी प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) तर शिरुर मतदारसंघासाठी आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांची नियुक्ती केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे (Purandar Assembly Constituency)
माजी आमदार विजय शिवतारे (Former MLA Vijay Shivatare) हेही शिंदे गटात आहेत.
त्याठिकाणी भाजपने बाबाराजे जाधवराव (Babaraje Jadhavrao) यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडून जिल्ह्यातील अनेक मतदारसंघावर दावा केला आहे.
परंतु तिथेही भाजपने निवडणूक प्रमुखांची नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे शिंदे गटातील समर्थक पदाधिकारी,
कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. विशेषत: मावळ आणि शिरुर मधील शिंदे गाटाच्या समर्थकांत चिंतेचे वातावरण आहे.

Web Title : Maharashtra Politics News | appointments of chiefs by bjp in shinde group seats too
chief minister supporters upset pune news

Related Posts